आंब्यावर तुडतुडे व फुलकिड तर काजूवर ढेकण्या प्रादुर्भावाची शक्यता
रत्नागिरी, ता. 11 : सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व पावसानंतर वातावरणामध्ये होणारा बदल किडींच्या वाढीसाठी अनुकूल आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये आंबा पिकावर तुडतुडे व फुलकिडी तसेच काजू पिकावर काजूवरील ढेकण्या आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तरी आंबा व काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमितपणे पाहणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. Damage to fruit crop due to cloudy weather


पिकांवर तुडतुडे व फुलकिडी प्रादुर्भाव आढळून आल्यास खालील किटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुडयांनी आर्थिक नुकसानीची पातळी (१० तुडतुडे प्रति पालवी / मोहोर) ओलांडली असल्यास व ज्याठीकाणी पिक पालवी अवस्थेत असेल अशा ठीकाणी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ०९ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, पिक बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. प्रती १० लिटर पाणी व पिक मोहोर अवस्थेत असल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. किंवा ब्युप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाणी तसेच जर फळे वाटाण्याच्या आकाराची अथवा त्याहून मोठी असल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के १ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी याप्रमाणात वापरावे. Damage to fruit crop due to cloudy weather


फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सदर कीडींच्या व्यवस्थापनाकरीता स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत). तसेच काजूमध्ये ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पालवी, मोहोर व फळधारणा झाली असल्यास त्याची पाहणी करावी. सदर किडींचा प्रादुर्भाव आढून आल्यास दोन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी. Damage to fruit crop due to cloudy weather