पर्यावरणाची हानी, शेकडो जुन्या घरांचे नुकसान
गुहागर, ता. 13 : शहराचा सर्वाधिक भाग सीआरझेडने व्याप्त आहे. या आराखड्यामुळे शहरातील शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या घरांचे नुकसान होणार आहे. तसेच नारळ, सुपारीच्या बागा, शेकडो वर्षांचे जुने वृक्ष नष्ट होतील. पर्यावरणाची, जैवविविधतेची हानी होईल. असा गाव उध्वस्थ करणारा शहर विकास आराखडा रद्द करावा. असे निवेदन आज गुहागर शहरवासीयांच्या वतीने तहसील व नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले. Damage due to Guhagar development plan
या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित विकास आराखड्यात दर्शविलेल्या 18 मीटर रुंदीच्या रस्त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली 90 टक्के घरे बाधित होत आहेत. आंबा, चिकू सारखी उत्पन्न देणारी झाले, शेकडो वर्षांची वड पिंपळ तोडावे लागणार आहेत. समुद्रकिनाऱ्यालगत 12 मीटर रुंदीच्या रस्त्यामुळे गुहागरचे वैभव असलेल्या नारळ सुपारीच्या बागा नष्ट होणार आहेत. या बागांच्या पलीकडे शासनाच्या ताब्यात असलेली 50 मीटर रुंदीचा जागा आहे. या जागेत धूप प्रतिबंधक बंधारा बांधून त्यावरुन 6 ते 9 मीटर रुंदीचा रस्ता होवू शकतो. Damage due to Guhagar development plan
शहर आराखड्यामध्ये दाखवण्यात आलेल्या तीस मीटर रुंदीच्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे गुहागर शहराचे दोन भाग होत आहेत. त्यामुळे शहरातील अत्यंत पुरातन आणि प्रसिद्ध अशी नर नारायण मंदिर, दत्त मंदिर, कोपरी नारायण मंदिर, वरचापाट येथील जामा मस्जिद व महाराष्ट्रातील हजारो लोकांची कुलस्वामिनी असलेली दुर्गा माता मंदिर बाधित होत आहेत. त्याचप्रमाणे सदरचा महामार्ग उत्पन्नाचे साधन असणारी भातशेती उध्वस्थ करीत आहे. गुहागरच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करता डोंगर उतारावरून पावसाळ्यात येणारे पाणी सदरच्या रस्त्यामुळे अडून प्रचंड हानी होणार आहे. त्यामुळे सदरचा महामार्ग गुहागर शहराच्या पूर्वेकडील सीमेवरील सपाट, गवताळ जमीनीवरुन प्रस्तावित करावा. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुने वस्ती वाढून नवे गुहागर विकसीत होईल. Damage due to Guhagar development plan
प्रस्तावित आराखड्यात दाखवलेली उच्चतमभरती रेषा व सीआरझेड 200 मीटरची टाकलेली रेषा ही 2011 च्या सूत्रानुसार आहे. 2011 नंतर गेल्या बारा वर्षांमध्ये सदर रेषेचे पुनर्परीक्षण झालेले नाही. त्यामुळे प्रथम गुहागर शहरातील सीआरझेडचे अद्ययावत रेखांकन व्हावे. गुहागर शहराचा समावेश सीआरझेड २ मध्ये व्हावा. त्यानंतर स्थानिकांना विश्वासात घेऊन नव्याने विकास आराखडा तयार करावा असे सर्व नागरिकांचे मत व इच्छा आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर सदरचा विकास आराखडा रद्द करावा. असे या निवेदनात म्हटले आहे. Damage due to Guhagar development plan