गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी वतीने दि. ९ मार्च २०२४ विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी १० ते १ महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ व रात्री ९ वाजता मुलांच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. Cultural programs at Tavasal school
कार्यक्रमाची सुरुवात “गणेशाला वंदन” करून करण्यात आली. त्यानंतर “माझ्या पप्पांनी गणपती आनला” या गाण्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या नाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमला रंग चढत असताना वायरल गाणं “मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात” या गाण्यावर महीला मंडळा कडून सुंदर नृत्य सादर केले. शेवटी “अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर प्रयोग सादर करून प्रेक्षकांना संदेश दिला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी बक्षिसांची उधळण करून मुलांना प्रोत्साहन दिले. Cultural programs at Tavasal school
या कार्यक्रमानिमित्त “मिशन आपुलकी अभियान अंतर्गत Dj श्री सचिन कुळये यांच्या संकल्पनेतून शाळेला लाईट बोर्ड – एक्टेंशन बोर्ड तयार करून भेट दिला. तसेच कै. सविता शंकर कुळये यांच्या स्मरणार्थ पारस सचिन कुळये यांच्या हस्ते भेट देण्यात आली. Cultural programs at Tavasal school
या कार्यक्रमासाठी शालेय व्य. स. अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्षा सौ. वैष्णवी निवाते मॅडम माजी सरपंच सौ. नम्रता निवाते मॅडम शिक्षणप्रेमी श्री विजय मोहिते, प्रतिष्ठित ग्रामस्थ चंद्रकांत निवाते, कृष्णा वाघे, बबन कुरटे, विजय नाचरे, संदीप जोशी, मुंबई मधील मकरंद परब तसेच डीजे सचिन कुळये यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अंकुर मोहिते, श्रीमती तनुजा सुर्वे, सौ. राजेश्वरी वेल्हाळ, शाळा व्यवस्थापन समिती, तांबडवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ व सचिन कुळये यांनी केले. Cultural programs at Tavasal school