गुहागर ता. 24 : युवा कार्यकर्ता श्री. राज रवींद्र विखारे यांच्या सौजन्याने २४ व २५ जून रोजी सलग दोन दिवस चालणाऱ्या खालचापाट येथील श्री गणराज चषक २०२३ भव्य ओपन अंडरआर्म पावसाळी क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने खेळाडूंनीही या स्पर्धेचा आनंद लुटला. Cricket tournament starts at Khalchapat
या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम ५०२१/- व चषक, उपविजेत्या संघाला रोख रक्कम ३०२१/- व चषक देऊन गौरविले जाणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन किरण कला मंडळाचे अध्यक्ष श्री उदय लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वीज महावितरणचे माजी लाईनमन श्री. अनंत धनावडे व श्री. एकनाथ जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. Cricket tournament starts at Khalchapat
यावेळी स्पर्धेचे संयोजक श्री. राज रविंद्र विखारे, श्री चंद्रशेखर लोखंडे, श्री. उदय लोखंडे, श्री. मुरलीधर गोयथळे, श्री. रमेश बेंडल, श्री.निलेश लोखंडे, धनंजय लोखंडे, दीपक जाधव, यश लोखंडे, साहिल लोखंडे, अथर्व लोखंडे, सुमित लोखंडे, गजेंद्र लोखंडे, अमेय लोखंडे
आदी उपस्थित होते. Cricket tournament starts at Khalchapat