विजेता स्वयंभू अंजनवेल संघ तर उपविजेता गुहागर महापुरुष संघ
गुहागर, ता. 07 : महापुरुष संस्कृतीक कला व क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्वयंभू अंजनवेल संघाने गुहागर महापुरुष संघावर मात करत विजेतेपद पटकावले. विजेत्या प्रथम क्रमांकास रोख रुपये 15000 तर उपविजेत्या द्वितीय क्रमांकास 11 हजार रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. Cricket tournament organized by Mahapurush
स्पर्धेतील मालिकावीर ऋतिक पारधी व अंतिम सामन्याचा सामानवीर सुईजित बागकर (स्वयंभू अंजनवेल), उत्कृष्ट फलंदाज यश लोखंडे, गोलंदाज राकेश राऊत, क्षेत्ररक्षक रुपेश गावडे (महापुरुष गुहागर) तसेच कुणाल देसाई, रुद्राश लाकडे, मनीष साखरकर, विराज बेंडल यांची प्लेअर ऑफ द डे निवड करण्यात आली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला पोलीस निरीक्षक सचिन सावंत, चंद्रभागा गॅस एजन्सीच्या संगीता हळदणकर, उद्योजक संदेश कलगुटकर, नितीन खानविलकर, प्रथमेश कदम, राहुल जाधव, वैभव गुहागरकर, प्रवीण रहाटे, मयुरेश कचरेकर आदी उपस्थित होते. Cricket tournament organized by Mahapurush