गुहागर, ता. 21 : तालुक्यातील श्री मानाई देवी क्रिकेट संघ (शिवणे), यांच्या वतीने दि. १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, मिरारोड येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक साई इलेव्हन संघ, (सडे जांभारी), द्वितीय क्रमांक रॉयल इलेव्हन संघ (आवरे), तृतीय क्रमांक आई पानबुडी देवी संघ (आंबवणे) यांनी पटकावला. विजेत्या संघास रोख रक्कम व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. Cricket tournament at Mumbai, Miraroad


या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर म्हणून अक्षय रॉयल क्रिकेट संघ आवरे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सौरभ माटल साई इलेव्हन क्रिकेट संघ जांभारी, हे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेत २० संघांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सदानंद जोशी (गावकर) यांचे चिरंजीव सुमित जोशी, अमित जोशी यांचे हस्ते करण्यात आले. श्री. राजेंद्र झगडे साहेब यांचेकडून संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी श्रीमती. आरती नाईक यांचेकडून कांदे -पोहे तर पाणी व्यवस्था श्री.दत्ताराम जी मते साहेब यांचेकडून करण्यात आली होती. या सर्वांचे सहकार्यांबाबत आभार मानण्यात आले. Cricket tournament at Mumbai, Miraroad


या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री.दत्ताराम सदनू जोशी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रेया सोलकर, तृतीय क्रमांकाचे पारितोषक श्री.तुषार दादा किंजलकर तसेच या स्पर्धेसाठी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक मदत करणारे, टिशर्ट, अन्य छोटी – मोठी पारितोषिके भेट देणाऱ्या सर्वांचे मनःपुर्वक आभार मानण्यात आले. Cricket tournament at Mumbai, Miraroad


यावेळी श्री भूषण ठोंबरे, सुरज जोशी, श्री संदीप जोशी, श्री दिपक ग. जोशी, श्री रवींद्र जोशी, श्री सुनील जोशी, श्री सुनील ठोंबरे, श्री दिलीप स. जोशी, श्री दिलीप सो. जोशी, सौ आरोही मकरंद जोशी, सौ सारिका धनंजय जोशी, सौ अवनी अविनाश ठोंबरे तसेच ग्रामस्थ, खेळाडू व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Cricket tournament at Mumbai, Miraroad