नागरून ठेवलेल्या बोटी तरंगल्या, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
गुहागर, ता. 26 : गेली आठवडाभर धो धो कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. एकीकडे घरे, गोठे, बांध कोसळणे, झाडे उन्माळून पडणे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असताना आता सततच्या पावसामुळे व दाभोळ खाडीला आलेल्या भरतीमुळे वेलदूर नवानगर परिसरातील लोकवस्ती मध्ये पाणी शिरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या पाण्याचा फटका मच्छिमारांनी नांगरून ठेवलेल्या बोटीना बसला. Creek water in populated areas


पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील अनेक ठिकणी नद्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले मिळत आहे. काही भागात रस्त्यांना गटारांचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धोधो पावसामुळे वेलदुर नवानगर परिसराला फटका बसला. लागत दाभोळ खाडी असल्याने समुद्राला भरती आल्याने नवानगर येथील घरांना धोका निर्माण झाला होता. भरतीमुळे पाणी अंगणापर्यंत पोहचले होते. साई मंदिर ते मराठी शाळेकडे जाणारा मार्ग पाण्याखाली होता. दुपारनंतर भरती संपल्यावर पाणी ओसरले. या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे. Creek water in populated areas