गुहागर, ता, 07 : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या निकृष्ट कामाचे अजब नमुने पुढे येत आहेत. अगोदरच वादात सापडलेला हा मार्ग निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एक वर्षातच या महामार्गवरील शृंगारतळी दरम्यान, रस्त्याचे काँक्रीट उखडले असून त्याच्या दुरुस्तीला पुन्हा सुरुवात झाली आहे. Crack the Guhagar Bijapur Highway
गुहागर – विजापूर रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा सुरुवातीपासूनच उडालेला आहे. रस्त्याच्या काँक्रीटला तडे जाणे, निकृष्ट गटारांचे काम, पुलांचे कठडे, भिंती यांची कामे व्यवस्थित झालेलीच नाहीत. तडे गेलेल्या काँक्रीटला सिमेंटचा मुलामा लावून किंवा त्यामध्ये डांबर भरण्याचे प्रकार मध्यंतरी सुरु होते. आता रस्त्याचे काँक्रीटच उखडल्याने तेवढा भाग खणून काढून पुन्हा एकदा तो भाग काँक्रीटचा करण्यात येत आहे. अवघ्या एक वर्षातच शृंगारतळी दरम्यान, रस्ता उखडला असून त्याची दुरुस्ती सुरु झाली आहे. आता बस थांब्याचा विषय प्राधान्याने पुढे आला आहे. रस्ता रुंदीकरणात बसथांबे तोडण्यात आले. शृंगारतळी बाजारपेठेत बसथांब्याची पिकपशेड ही ३६ फूट होती. आता नव्याने ती १५ बाय १० ची बांधण्यात येत आहे. वास्तविक पूर्वी जेवढी होती तेवढीच करणे क्रमप्राप्त आहे. शृंगारतळी ही तालुक्याची आर्थिक राजधानी असून येथे नेहमीच ग्राहक, प्रवासी, शाळा – महाविद्यालयीन विद्यार्थी यांची गर्दी होते. पिकपशेडमध्ये बसायलाही जागा पुरत नाही. त्यातच जुनी मोठी पिकपशेड तोडण्यात आल्याने आता नवी पिकपशेड केवळ १५ फूट बांधण्यात येत असल्याने याला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. Crack the Guhagar Bijapur Highway
नुकतीच पाटपन्हाळे तंटामुक्त समितीची बैठक झाली. या बैठकीत यावर चर्चा झाली. तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा विषय घेऊन त्याला विरोध करण्यात आला. तातडीने संबंधित विभागाला पत्र देण्यात आले आहे. मात्र, त्या विभागाने पिकपशेड पूर्वीसारखी मोठी करता येणार नाही, असे पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे शृंगारतळीचा पिकपशेडचा विषय चिघळणार आहे. तसेच पाटपन्हाळे येथे मुख्य बसथांब्याजवळ दोन पिकपशेड मंजूर असूनही एकच पिकपशेडचे काम सुरु करण्यात आले आहे. यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. Crack the Guhagar Bijapur Highway