भाजप, विहींपचे पोलीसांना निवेदन, तस्करीमागे महाड कनेक्शन
गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातून गोमातांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारने गायींना राज्य गोमातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी गोतस्करांवंर कठोर कारवाई करावी. या घटनेच्या मुळापर्यंत पोचून मुख्य सुत्रधारांना शोधून काढावे. गोतस्करीचे रॅकेट उध्वस्थ करावे. अशी मागणी विश्र्व हिंदु परिषदचे कोकण प्रांत सहमंत्री अनिऋद्ध भावे यांनी केली आहे. Cow smuggling
गुहागरमधुन 5 गायींची तस्करी करताना विहिंपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री 1 च्या सुमारास वाहन पकडले. या घटनेतील 5 जणांना गुहागर पोलीसांनी अटक केली. मात्र पोलीसांकडून अपेक्षित कडक कारवाई होत नव्हती. त्यामुळे तातडीने विश्र्व हिंदु परिषदेचे सहमंत्री भावे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनामध्ये भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमांद्वारे कारवाई करावी याचाही उल्लेख करण्यात आला होता. Cow smuggling
गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने देखील गुहागर पोलीसांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा हे पेव पोहचलेले असल्याचे भयानक सत्य यावेळी समोर आले आहे.अशी हिम्मत पुन्हा कोणी करू नये, गोमातेच्या तस्करीला आळा बसावा याकरता गोमातेच्या तस्करांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. गोमातेची विक्री करणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या, खरेदी करणाऱ्या दलालांवर जशी कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपले गोधन या कसायांच्या हाती देणाऱ्या गोमातेच्या मालकांना सुद्धा त्याच पद्धतीने समज देण्याची, शिकवण देण्याची गरज असल्याचे यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे सांगितले. निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अनिऋद्ध भावे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी गुंगीचे औषध घालून बेशुध्द केलेल्या गायींची तस्करी मंडणगड परिसरात उघड झाली आहे. गुहागर आणि मंडणगड मधील प्रकरणातून गोतस्करीमागे महाडमधील कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालून गोतस्करीच्या मुळापर्यंत पोचावे आणि संपूर्ण रॅकेट उध्वस्थ करावे अशी विनंती आम्ही केली आहे. Cow smuggling