गुहागर, ता. 19 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे पहिले तालुकाध्यक्ष आणि कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून काम करणारे श्री. राजेश रमेश शेटे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी रात्री वरचापाट येथील निवासस्थानी निधन झाले. सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व हरपल्याने शहरासह तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. Covid warrior Rajesh Shete is No More
श्री. राजेश शेटे हे गेली अनेक वर्ष मुंबईत आपला व्यवसाय सांभाळत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर राजेश शेटे देखील गुहागर मध्ये आपल्या गावी येऊन मनसेचे काम सुरु केले. सभासद नोंदणीवर भर देत तालुक्यात संघटना वाढीचे काम केले. नागरिकांच्या समस्यांवर व रत्नागिरी गॅस आणि विदयुत प्रकल्पातील कामगार भरतीबाबत आवाज उठवला. दिलदार स्वभावाने सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपलेसे केले होते. हॉटेल व्यवसाय आणि राजकारण असा समतोल त्यांनी ठेवला. Covid warrior Rajesh Shete is No More
देशासमोर कारोना महामारीचे संकट उभे राहीले. या काळात गुहागर शहरात रहाणाऱ्या परप्रांतीय कुटुंब यांना अन्न धान्य, चिपळूण येथील महापूरामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाना मदत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सलग ३ महिने स्व खर्चाने जेवणाचे डबे उपलब्ध करुन दिले. याशिवाय कोरानाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी गुहागर नगरपंचायतीला जळावू लाकडे उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या कार्याबद्दल गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे राजेश शेटे यांना स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कार देऊन एप्रिल 2023 मध्ये गौरविण्यात आले. राजेश शेटे यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नीचेही योगदान होते. पश्चात पत्नी व एक मुलगी आहे. Covid warrior Rajesh Shete is No More