• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विज्ञान प्रदर्शनानिमित्त भरडधान्य पाककला स्पर्धा

by Guhagar News
December 16, 2023
in Guhagar
86 1
0
विज्ञान प्रदर्शनानिमित्त भरडधान्य पाककला स्पर्धा
169
SHARES
484
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थीनी हुरीया घारे व शिक्षिका नमिता वैद्य प्रथम 

गुहागर, ता. 16 : सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून ५१ व्या गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने भरड धान्य पाककला स्पर्धेचे आयोजन लोकशिक्षण मंडळाच्या आबलोली कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थी व शिक्षक या दोन्हीही गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Cooking competition on the occasion of science fair

शिक्षक गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या भरडधान्य पाककला स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका नमिता प्रसन्ना वैद्य यांनी बनवलेल्या भरडधान्याच्या थालीपीठाने प्रथम क्रमांक, सडेजांभारी नं २ प्राथमिक शाळेच्या शिक्षिका पल्लवी पांडुरंग डिंगणकर यांनी  व्दितीय क्रमांक तर पोमेंडी नं १ शाळेचे शिक्षक वासुदेव रामचंद्र साळवी यांनी तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादित केले. तर विद्यार्थ्यांच्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या भरडधान्य पाककला स्पर्धेत शृंगारी उर्दू  हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हुरीया अन्वर घारे हीने बनवलेल्या  नाचणीच्या शेंगेने प्रथम क्रमांक, ना.गोपाळकृष्ण विद्यालय कोतळुकची विद्यार्थीनी श्रावणी संजय घाणेकर हीने व्दितीय क्रमांक तर सरस्वती विद्यामंदिर जामसुत ची विद्यार्थिनी पुजा सुहास काताळकर हीने तृतीय क्रमांक पटकावला. Cooking competition on the occasion of science fair

भरडधान्य यांचा आहारात समावेश व सेवन तसेच भरडधान्यांचे आहारातील आरोग्य विषयक फायदे याबाबत जनजागृती होण्यासाठी सदर पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांनी त्यावेळी सांगितले. या  भरडधान्य पाककला स्पर्धेसाठी पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेच्या शिक्षिका सुलक्षणा राशिनकर- करडे यांनी विविध प्रकारच्या भरडधान्यापासून रेखाटलेली अत्यंत सुरेख “भरडधान्य रांगोळी” विशेष लक्षवेधी ठरली. Cooking competition on the occasion of science fair

विजेत्यांना सहायक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, लोकशिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून रिगल कॉलेज शृंगारतळीचे विक्रम गणेश खैर, आबलोलीच्या समुदाय आरोग्य अधिकारी नैना संदिप शेळके व प्रा.सोनाली मंगेश मिरगल यांनी काम पाहिले. Cooking competition on the occasion of science fair

Tags: Cooking competition on the occasion of science fairGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.