गुहागर, ता. 29 : गुहागर – विजापूर रस्ता रुंदीकरणात क्राँक्रीट तयार करणारे महाकाय मशीन गेली १५ दिवसांपासूनच गिमवी -काळसूर कौंढर रस्त्यात आहे. या मशीनरीने अर्धा रस्ता व्यापलेला असून रात्रीच्या वेळी हायवेवरुन सुसाट येणाऱ्या वाहनांना हे मशीन लक्षात येत नाही. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळे येत आहेत. अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. Concreting machine on road
काळसूर कौंढर दरम्यान, बरेच वर्षे रस्ता रुंदीकरण रखडले होते. अखेर येथील रुंदीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून काँक्रीटीकरण झाल्यावरही हे मशीन तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापलेला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी हायवेवरुन सुसाट येणाऱ्या वाहनांना हे मशीन लक्षात येत नाही. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळे येथे आहेत. येथील काम झाल्यावर हे मशीन ठेकेदाराने तेथून हलविले पाहिजे होते. मात्र, अजूनही ठेकेदार निद्रिस्त असल्याचे बोलले जात आहे. Concreting machine on road