गुहागर, ता. 10 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मंगेश गोरिवले यांच्या हस्ते करण्यात आले. Commerce Fest at Patpanhale College
विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणाला वाव मिळावा, विविध व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे, त्यांच्या ज्ञानात, आत्मविश्वासात वाढ व्हावी आणि मार्केटिंगचे कौशल्य यावेत यासाठी सलग चार दिवस कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण पाच प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात आले आणि या सर्व स्पर्धेसाठी एकूण 35000 रुपयांची बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास तीन हजार, द्वितीय क्रमांकास दोन हजार आणि तृतीय क्रमांकास एक हजार रुपये तसेच आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच मार्केटिंग स्पर्धेसाठी काही विशेष बक्षीसही देण्यात आले. Commerce Fest at Patpanhale College


सुरवातीला वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धा अशी घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या धरतीवर ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये 212 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दुसरी स्पर्धा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन घेण्यात आली. यामध्ये एकूण 49 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला परीक्षक म्हणून डी बी जे महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख ऋचा खवणेकर मॅडम उपस्थित होत्या. तिसरी बुक रिव्ह्यू स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला परिक्षक म्हणून गुहागर ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापिका सौ मनाली बावधनकर यांनी काम केले. चौथी फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 84 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन आबलोली जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री व्हनमाने सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रामुख्याने निसर्गावर आधारित विविध प्रकारच्या सुंदर अशा फोटोंचा त्यामध्ये समावेश होता. या स्पर्धेचे परीक्षण शृंगारतळी येथील नामवंत व्यावसायिक शौकत मुजावर यांनी केले. Commerce Fest at Patpanhale College


वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम क्रमांक वसुधा भागडे, द्वितीय क्रमांक कोमल झिम्बर आणि तृतीय क्रमांक जानवी विचारे व अवधूत समजिस्कर यांना विभागून
पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा – प्रथम क्रमांक ईश्वरी संसारे, द्वितीय क्रमांक श्वेता शितप आणि तृतीय क्रमांक वेदांगी मराठे
बुक रिव्ह्यू स्पर्धा – प्रथम क्रमांक श्वेता शीतप, द्वितीय क्रमांक ईश्वरी संसारे आणि तृतीय क्रमांक आर्या वेल्हाळ व अदिती कुलकर्णी यांना विभागून
फोटोग्राफी स्पर्धा – प्रथम क्रमांक श्वेता शीतप, द्वितीय क्रमांक प्रणव रावणंग आणि ईश्वरी संसारे तसेच तृतीय क्रमांक सुरज घाणेकर आणि अरविंद पवार यांना विभागून
मार्केटिंग स्पर्धा – सर्वात आकर्षणाची असणारी स्पर्धा म्हणजे मार्केटिंग स्पर्धा होय. या स्पर्धेमध्ये एकूण 29 गटाने सहभाग घेतला प्रत्येक गटामध्ये पाच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन विविध वस्तूंचे मार्केटिंग करावयाचे होते. काही विद्यार्थ्यांनी ब्रँड असणाऱ्या वस्तू तर काही विद्यार्थ्यांनी ब्रँड नसणाऱ्या 37 वस्तूंची निवड केली आणि तीन दिवसांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मिळून तीन लाख सदतीस हजार रुपयांची विक्री केली. तळी बाजारपेठ, गुहागर बाजारपेठ, चिखली, मळण, वेळंब, परचुरी, असगोली, आबलोली इत्यादी गावात जाऊन विविध वस्तूंचे मार्केटिंग केले. Commerce Fest at Patpanhale College


या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध उद्योजक श्री शामकांत खातू , तेजल पेढामकर आणि विनोद पटेल यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक देवराज टाकळकी यांच्या ग्रुपने मिळवला, द्वितीय क्रमांक स्वरांगी नरळकर यांच्या ग्रुपने आणि तृतीय क्रमांक ईश्वरी संसारे यांच्या ग्रुपने मिळवला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट सेलर म्हणून आकाश वहाळकर याने तर बेस्ट सेल्स म्हणून स्नेहल केंबळे यांनी बक्षीस मिळवले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तळवली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम ए थरकार आणि श्री संतोष वरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तळी, तळवली, रामपूर जुनिअर कॉलेज आणि डी बी जे कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे के आर यांच्या मार्गदर्शनानुसार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुभाष खोत, कांचन कदम आणि वाणिज्य मंडळाने विशेष प्रयत्न केले. Commerce Fest at Patpanhale College