प्रांतधिकारी, तहसीलदार व शेकडो सदस्य यांचा सहभाग
गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी गुहागर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रांतधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार परीक्षित पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांच्यासह 350 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता. गुहागर शहरातील सर्व प्रमुख रस्ते व तहसील कार्यालय आणि पोलीस स्थानक परिसरात स्वच्छता करण्यात आली. Cleanliness Mission by Nanasaheb Dharmadhikari Pratishthan