गुहागर, ता. 19: नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दि.१८/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ या कालावधीत विविध उपक्रम निहाय राबविण्यात येणार आहेत. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ गुहागर नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. Cleanliness fortnight launched at Guhagar


सदर कार्यक्रमसाठी सफाई मित्र यांना शासनाच्या विविध योजणांचा लाभ देणेकारिता स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव व NULM च्या शहर समन्वयक आंबवकर मॅडम, शहर समन्वयक अक्षय सावंत, स्वच्छता विभाग लिपिक सुनील नवजेकर आदी उपस्थित होते. सदर विविध उपक्रम गुहागर नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.स्वप्नील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. गुहागर नगरपंचायत हद्दीमध्ये पुढील १४ दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर मोहीम यशस्वी राबविन्याकरिता गुहागर नगरपंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद मेहनत घेत आहे. Cleanliness fortnight launched at Guhagar

