• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सनई वादक बाबू गावणंग यांचे निधन

by Guhagar News
June 3, 2024
in Guhagar
148 1
0
Clarinet player Babu Gawanang is No More
291
SHARES
830
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उमराठ खुर्दचे ग्रामस्थ, गायन व हस्तकलेत पारंगत

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक बाबू गोपाळ गावणंग यांचे गुरूवार दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी मुंबईला कुर्ला येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. उमराठ गावाच्या विकास कामांत आणि जडणघडणीत एक आधारस्तंभ तसेच सक्रिय सहभाग घेणारे उत्तम मार्गदर्शक होते.  गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोलाचे योगदान असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुनबाई, तीन मुली, नातवंडे आणि भाऊबंद असा मोठा परिवार आहे. Clarinet player Babu Gawanang is No More 

कै. बाबू गावणंग हे स्वभावाने स्मितहास्यी, शांत, मनमिळावू, परोपकारी, सर्व लहान-थोर मंडळींशी अगदी मिळून-मिसळून मनमोकळेपणाने वागणारे होते. लहानपणापासून त्यांना शेतीची आणि इतर कष्टाची कामे करण्याची सवय असल्यामुळे त्यांची शरीरयष्टी काटक आणि उंच धिप्पाड होती. ते एक साधी राहणी आणि उच्च विचार सरणीचे व्यक्तिमत्त्व होते. Clarinet player Babu Gawanang is No More

त्यांच्या अंगी अनेक नाविन्यपूर्ण गुण अवगत होते. ते एक उत्तम सनई वादक व उत्तम आचारी होते. शुभ लग्नकार्यात किंवा धार्मिक कार्यक्रमांतील जुन्या आठवणीतील सनई वादनात त्यांचा हातखंड होता. पंचक्रोशीत त्यांचा उत्तम सनई वादक म्हणून नावलौकिक होता. गावात लग्नकार्ये असोत किंवा सार्वजनिक धार्मिक कार्ये असोत जेवण बनवणाऱ्या आचारींच्या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी असायचे. शिवाय हस्तकलेत सुद्धा त्यांचा हातखंड होता. बांबूच्या टोपल्या, डालगी, खुराडे आणि इतर वस्तू बनविण्याची उत्तम कला त्यांच्या अंगी होती. आंबेकरवाडीच्या नमन लोककलेत गायकी गाणारे आधारस्तंभ होते. असे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारी व्यक्ती नियतीच्या कालचक्रानुसार निघून गेल्याचे दुःख निश्चितच सर्वांना आहे. Clarinet player Babu Gawanang is No More

संपूर्ण आंबेकरवाडीच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोतच. त्या दुखाःतून बाहेर येण्यासाठी/ सावरण्यासाठी त्यांच्या कुटूंबिंयाना धैर्य, ताकद आणि शक्ती मिळो तसेच दिवंगत कै. बाबू गोपाळ गावणंग यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हिच सर्वांतर्फे तसेच ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. Clarinet player Babu Gawanang is No More

Tags: Clarinet player Babu Gawanang is No MoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.