• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण अर्बन बँक देणार पर्यटनाला चालना

by Manoj Bavdhankar
August 29, 2024
in Guhagar
250 2
0
Chiplun Urban Bank will promote tourism
491
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मोहन मिरगल; आई पर्यटन धोरणाअंतर्गत कर्ज योजना सुरू

गुहागर, ता. 29 : कोकणात पर्यटन क्षेत्र झपाटाने वाढत आहे. याच पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेने शासनाच्या महिला प्रवर्गा साठी असलेल्या आई पर्यटन धोरण अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजना सुरू केली असल्याची  माहिती  बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल यांनी दिली. बँकेचे अध्यक्ष पद घेतल्यावर आज प्रथमच मोहन मिरगल  यांनी गुहागर तालुक्यातील चिपळूण अर्बन बँकेच्या शाखांना भेट दिली. गुहागर येथील चिपळूण अर्बन बँकेच्या शाखेत ग्राहकांशी संवाद साधला. यावेळी सोबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई,  संचालक धनंजय खातू, प्रशांत शिरगावकर, गुहागरचे शाखा अधिकारी संतोष संसारे, अधिकारी रजनी सकपाळ आधी उपस्थित होते. Chiplun Urban Bank will promote tourism

Chiplun Urban Bank will promote tourism

यावेळी मिरगल यांनी सांगितले की, शासनाच्या महिला प्रवर्गासाठी असलेल्या आई पर्यटन धोरण अंतर्गत  करेंव्हॅन, विच शॅक, साहसी पर्यटन  पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, निवास व न्याहारी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊस वोट, टेंट, ट्री हाऊस, हॉटेल, व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वुडन कॉटेजेस, पॉडस, महाभ्रमण . रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्त फुड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी. टुर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टुर मार्गदर्शक, क्रुज, टुर अॅण्ड ट्रव्हल्स एजन्सी, आर्ट अॅण्ड क्राफ्ट व्हिलेज, टुरिस्ट ट्रांस्पोटर्स ऑपरेटर, हाऊस बोट .आदीवासी/निसर्ग पर्यटनाशी संबंधीत प्रकल्प, मेडीकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा योगा केंद्र . इतर पर्यटन व्यवसाय पर्यटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरणारे उदा सोव्हिनिअर शॉप, विविध खादय पदार्थ विक्रेते, इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाचा प्रकार यामध्ये येतात यासाठी ग्राहकांनी नजीकच्या चिपळूण अर्बन बँक शाखेची संपर्क करावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल  यांनी केले आहे. Chiplun Urban Bank will promote tourism

शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच  खाती काढायची असतील त्यांनी लवकरात लवकर बँकेत खाते काढावीत या योजनेअंतर्गत पैसे जमा होतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई यांनी सांगितले. यावेळी किरण खरे, विजय सावंत, अरुण ओक, गणेश भिडे ,अतुल साखरकर , सारिका कनगुटकर, जयदेव मोरे ,नरेश पवार आधी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी मोहन  मिरकल यांची चिपळूण  अर्बन बँक अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अभिनंदन केले. Chiplun Urban Bank will promote tourism

Tags: Chiplun Urban Bank will promote tourismGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share196SendTweet123
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.