• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण रेल्वे परिसराचे सुशोभिकरण

by Guhagar News
June 8, 2024
in Ratnagiri
101 1
1
Chiplun railway station beautification
199
SHARES
569
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 08 : कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानक आता लवकरच आकर्षक स्वरूपात पहायला मिळणार आहे. सुमारे ५ कोटी रुपयांतून रेल्वे परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाने गती घेतली आहे. रस्ता, शेडसह आवश्यक सोई सुविधाही उपलब्ध केल्या जाणार असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोयसुद्धा दूर होणार आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. Chiplun railway station beautification

कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांमध्ये सोई-सुविधांचा अभाव जाणवत होता. यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे रस्ता ते रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवाशांमधून या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. तर दुसरी रेल्वे स्थानक परिसरात वाहने पार्किंग शेडची व्यवस्था नव्हती, तसेच प्रवाशांची गर्दी झाल्यास अथवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पाऊस, उन्हात उभे राहायचे म्हटले तर कोणतीही सोयीसुविधा नाही. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूणसह खेड रेल्वे स्थानक, परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. Chiplun railway station beautification

Tags: Chiplun railway station beautificationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.