महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेने तर्फे आयोजन
गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे दिनांक 18 जुलै 2024 रोजी भव्य जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा चिपळूण मधील नारदखेरकी गावामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन शेतकरी सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा. श्री उमेश रमेश लटके, चिपळूण चे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष मा. श्री. सुरेशजी घाग आणि मनसे चे चिपळूण जि.प.कलंबट गटाचे उप तालुका अध्यक्ष मा. श्री संतोषजी हातिस्कर यांनी केले होते. Chiplun mud plowing competition
या संपूर्ण चिखल नांगरणी स्पर्धत चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातुन जवळ जवळ 74 नामांकित बैल जोड्या, शेतकरी मालक, नामांकित जॅकी आपले गावठी व घाटी बैल जोड्या घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण घाटी गट आणि गावठी गट मिळून एकूण 1 लाख सात हजार चे रोख रक्कम बक्षीस आणि मानाचे चषक देऊन विजेत्या 14 बैल जोडी मालकांना व नांगरणी चालकाला बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय, शर्यत प्रेमी शेतकरी, महिला भगिनी, तरुण मंडळी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. Chiplun mud plowing competition
या स्पर्धेत विजेते म्हणून घाटी गटातून रत्नागिरी पाली येथील बैलजोडी श्री.संजय वामन सावंत यांच्या दोन्ही बैल जोडी यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक चे पारितोषिक विजेते झाले. तिसऱ्या क्रमांक वर स्वराज्य स्वप्नील गुरव, चौथ्या क्रमांक वर संगमेश्वर तूरळ मधील अर्णव सचिन हरेकर, पाचव्या क्रमांकावर शिंदे आंबेरे येथील संतोष सीताराम आलीम, सहाव्या क्रमांक वर चिपळूण शिरवली येथील भैरी चंडिका, सातव्या क्रमांक वर आरवली येथील स्वराज्य स्वप्नील गुरव या सर्व शेतकरी मालकांच्या पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गावठी बैल जोडी मधून विजेते म्हणून प्रथम क्रमांक शिरवली भैरी चंडिका, द्वितीय क्रमांक मालघर मधील प्रकाश किळजे, तृतीय क्रमांक वाडावे सराडे मधील सुरेश पर्शुराम सोलकर, चौथ्या क्रमांक मालघर मधील गंगारामशेठ महाडिक, पाचवा क्रमांक संगमेश्वर तूरळ मधील विग्नेश दिनेश हरेकर, सहावा क्रमांक शिंदे आंबेरे येथील कृष्णा काशीराम शिंदे, सातवा क्रमांक वर शिरवली भैरी चंडिका राजू लाड या सर्व मालकांच्या बैल जोडीनी या स्पर्धेत थरारक मैदान पार पाडुन विजेते म्हणून घोषित करण्यात आले. आणि या सर्व बैल जोडीनंवर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. या विजेते बैल जोडी मालकांना मान्यववरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. Chiplun mud plowing competition
या स्पर्धेत प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून मनसेचे नेते मा.श्री.अविनाशजी ( दादा ) जाधव, राज्य सरचिटणीस, कोकण चे नेते, मा. श्री.वैभवजी खेडेकर, गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी गांधी, उपजिल्हा अध्यक्ष मा. विनोदजी जाणवळकर, जिल्हा सचिव मा. संतोषजी नलावडे, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा. उमेशजी लटके, गुहागर तालुका अध्यक्ष मा. श्री.सुनीलजी हळदणकर, नारदखेरकी चिपळूण चे तालुका अध्यक्ष मा. विश्वनाथ डोळस, दापोली मधील तालुका अध्यक्ष मा. केदारजी साठे, ग्रा.पं. सरपंच मा. श्री. राघो गणपत आंबवकर, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र खेतले, मनसे चिपळूण तालुका सचिव मा. संदेश साळवी, शेतकरी सेनेचे चिपळूण तालुका अध्यक्ष मा.सुरेश घाग, खेडचे तालुका अध्यक्ष मा.मंगेशजी चाळके, गुहागर चे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष मा.प्रसादजी कुष्टे, खेड चे शहराध्यक्ष मा. ऋषिकेश कानाडे, दापोली शराध्यक्ष मा. साई पुसाळकर, गुहागर शहराध्यक्ष मा. नवनाथ साखरकर, भाजप चे माजी तालुका अध्यक्ष मा.सतीशशेठ मोरे, मा. विनोदजी भोबस्कर, भाजप चे रत्नागिरी चिटनिस मा. गणेशजी हळदे, भाजप गुहागर कोषाध्यक्ष मा. सौरभजी चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार मा. शेखर सर यांचे स्वीय सहाय्यक मा.मोहन शेठ सावंत, मनविसे चे माजी जिल्हा अध्यक्ष मा.नंदूजी साळवी, सहकार सेनेचे ता.अध्यक्ष मा.विनोदजी चिपळूणकर, जि.प.कलंबट गटाचे उप तालुका अध्यक्ष मा. संतोषजी हातिस्कर, जि. प. कलंबट चे विभाग अध्यक्ष मा. रमेशजी वेलोंडे, वेळनेश्वर जि.प गट श्री. नितीन कारकर, शेतकरी सेना उप ता.अध्यक्ष मा.निकिल महाडिक, मनविसे चे उत्तर रत्नागिरी चे उपजिल्हा अध्यक्ष मा. गुरुनाथ नागे, मनविसे चिपळूण ता.अध्यक्ष मा.सागर कदम, श्री.सोहमजी पाथरे, दापोलीमधील श्री. पुसाळकर साहेब,ओमळी येथील ग्रा.पं. सदस्य मा. श्री. सतीश कदम, नारदखेरकी उपस्थित होते. Chiplun mud plowing competition
या स्पर्धेचे खास समालोचन मालघर येथील श्री. वैभव पवार सर, श्री. प्रदीपसर मोहिते, नारदखेरकी गावामधील आयोजक आणि नियोजन करणारे श्री. विलास दळवी, श्री. संदीप (पप्पू) हळदकर, माजी सरपंच मा.पांडुरंगजी बांद्रे, श्री.रविंद्रशेठ दळवी, श्री.विजय सि. झगडे (ग्रा. पं सदस्य), श्री.सुनील जाधव, श्री. प्रशांत मोहिते, श्री.सुधीर म्हस्के, श्री.रविंद्र खैर, श्री.रमेश गावडे, श्री. बेब्या हुमणे, श्री. अनिल सावंत, श्री. संतोष खांबे, श्री. दत्ताराम बांद्रे, श्री.अर्जुन बांद्रे, श्री.नारायण गांधी, श्री.चंद्रकांत जाधव, रघुनाथ चाळके, श्री. दीपक बांद्रे, श्री. दत्ताराम सावंत, जागा मालक.श्री प्रकाश झगडे, श्री. गोविंदशेठ बांद्रे, श्री. दाजीशेठ बांद्रे, श्री. मारुती बांद्रे (ग्रा.पं सदस्य ), श्री. संजय द. बांद्रे, श्री.हरिचंद्र झगडे, श्री.रुपेश दळवी, श्री.प्रसाद हळदणकर, ओमळी येथील गावकर श्री. शंकर कदम, मनसे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपविभाग अध्यक्ष आणि मनसैनिक नानू हातीस्कर, सुजल मयेकर, सुमित जाधव, बाळा रसाळ, श्री.गोपीनाथ कदम, श्री. संदेश मयेकर, गावातील सर्व मनसैनिक, सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला भगिनी आणि शेतकरी प्रेमी, व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Chiplun mud plowing competition