रत्नागिरी, ता. 27 : चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धा 29 डिसेंबर 2024 सकाळी 6 ते 10 वाजता या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई गोवा महामार्गावरून घेण्यात येणार होती. परंतु सदरचा महामार्ग हा घाटगामार्गाचा असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आयोजकांनी सदरचा मार्ग बदलून पुढील मार्ग निवडण्यात आला आहे. Chiplun Half Marathon Competition
या मॅरेथॉन स्पर्धेकरीता 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र-शिवाजी चौक मार्गे मुख्य बाजारपेठ रस्ता-गांधीचौक-नाथ पै चौक-डाव्याबाजूने मच्छिमार्केट-खंड चौकी- उक्ताड बायपास- एनरॉन पुल मार्गे करंजेश्वरी कमानीवरून गोवळकोट रोड-गोवळकोट धक्का कालुस्ते ब्रीज- लंडन रोड, कालुस्ते मोहल्ला मार्गे कालुस्ते गाव कोंढे करंबवणे मुख्य रस्ता पर्यंत व तेथून परत करंजेश्वरी कमान मार्गे गोवळकोट रोड पेठमाप बायपास-फर्शी तिठा-रेल्वे रोड मार्गे रेल्वे ब्रिज-गांधारेश्वर तिठा-गणपती मंदिर मार्ग-महाराष्ट्र हायस्कूल रोड मार्ग परत इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्र असा रहदारीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. Chiplun Half Marathon Competition


सदर मुदतीत वरील मार्गावर 1) बहादूर शेख नाक्याकडून येणारी वाहतुक रेडीज पेट्रोलपंप येथे बंद करून प्रभात रोड मार्गे 2) एस. टी. स्टँड पासून पावर हाउसकडे तसेच बहादूर शेख नाक्यातून मुंबई गोवा हायवे मार्ग पाग पावर हाऊसकडे वळविण्यात यावी. गुहागरकडून येणारी वाहतुक उक्ताड माश्याचा काटा येथे बंद करून गुहागर बायपास मार्गे वळविण्यात यावी 3) पेढे फरशी या ठिकाणाहून पेठमापकडे येणारी वाहतुक फरशी तिठा येथे बंद करून बहादुर शेखनाका मार्गे वळविण्यात यावी 4) कालुस्ते तिठयाकडून कालुस्ते व गोवळकोट गावाकडे येणारी वाहतुक कालुस्ते तिठा येथे बंद करून कोंढे फाटा येथून वळविण्यात येणार आहे. Chiplun Half Marathon Competition
स्पर्धेकरीता सुमारे एक हजार स्पर्धक विविध ठिकाणाहून येणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग हा चिपळूण शहरातील मध्यवर्ती रोड असून सदर रोडवर वाहतुकीची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. मॅरेथॉन स्पर्धेवेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था दृष्टीकोनातून मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 नुसार प्र. अपर जिल्हादंडाधिकारी राहुल गायकवाड यांनी वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 198 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे .असेही आदेशात नमूद केले आहे. Chiplun Half Marathon Competition