अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने 31 डिसेंबर रोजी
गुहागर, ता. 22 : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने बालक पालक शिक्षक मेळावा आणि गुणगौरव समारंभ 31 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. Child parent teacher meeting and merit ceremony
या मेळाव्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी. नवोदय विद्यालय गुणवत्ताधारक विद्यार्थी, माध्यमिक शाळांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मधील विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, एकलव्य पुरस्कार विजेता विद्यार्थी व विद्यार्थिनी. तालुक्यातील वर्षभरात सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, नासा व इस्रो करिता निवड झालेले विद्यार्थी, जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, नवोपक्रम प्राप्त शिक्षक व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आदर्श शाळेतील शिक्षक यांचा रोख पारितोषिक, भेटवस्तू, सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव केला जाणार आहे. Child parent teacher meeting and merit ceremony


तालुक्यातील शिक्षण चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 1992 पासून अखिल तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तीस वर्षे हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. सदर गुणगौरव समारंभ हा सेवानवृत्त अपग्रेड मुख्याध्यापक श्री दिवाकर धोंडू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सदर कार्यक्रमाला सर्व सत्कार प्राप्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील व सरचिटणीस प्रकाश जोगले यांनी केले आहे. Child parent teacher meeting and merit ceremony