• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बालक पालक शिक्षक मेळावा व गुणगौरव सोहळा

by Manoj Bavdhankar
December 22, 2023
in Guhagar
81 0
0
Child parent teacher meeting and merit ceremony
158
SHARES
452
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने 31 डिसेंबर रोजी

गुहागर, ता. 22 : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने बालक पालक शिक्षक मेळावा आणि गुणगौरव समारंभ 31 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे.  Child parent teacher meeting and merit ceremony

या मेळाव्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी. नवोदय विद्यालय गुणवत्ताधारक विद्यार्थी, माध्यमिक शाळांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मधील विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, एकलव्य पुरस्कार विजेता विद्यार्थी व विद्यार्थिनी. तालुक्यातील वर्षभरात सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, नासा व इस्रो करिता निवड झालेले विद्यार्थी, जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, नवोपक्रम प्राप्त शिक्षक व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आदर्श शाळेतील शिक्षक यांचा  रोख पारितोषिक, भेटवस्तू, सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव केला जाणार आहे. Child parent teacher meeting and merit ceremony

तालुक्यातील शिक्षण चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 1992 पासून अखिल तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तीस वर्षे हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. सदर गुणगौरव समारंभ हा सेवानवृत्त अपग्रेड मुख्याध्यापक श्री दिवाकर धोंडू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सदर कार्यक्रमाला सर्व सत्कार प्राप्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील व सरचिटणीस प्रकाश जोगले यांनी केले आहे. Child parent teacher meeting and merit ceremony

Tags: Child parent teacher meeting and merit ceremonyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.