• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत बाल अंतराळवीरांनी चालवली सायकल

by Guhagar News
May 9, 2025
in Ratnagiri
44 0
0
Child astronauts ride bicycles
86
SHARES
246
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी, ता. 09 : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित पहिल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये बाल अंतराळवीरांनी सायकल चालवली. विविध ग्रह, खगोलशास्त्रज्ञांचे फोटो व माहिती आणि प्रतिकृती सायकलवर साकारून, तसेच काहींनी चांद्रयानाची प्रतिकृतीसुद्धा सायकलवर लावली. दोन गटातील बालदोस्तांनी पाच व दहा किमी सायकल चालवली. या उपक्रमाचे रत्नागिरीत प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, वाहतूक पोलिस आणि जिल्हा प्रशासन, पालकांचे सहकार्य यामुळे या उपक्रमाची चर्चा रंगली. Child astronauts ride bicycles

इस्रो, आयुका या संस्थांनी आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी देखील हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सुवर्णसूर्य फाउंडेशनचे विशेष कौतुक केले. या उपक्रमाचे इतर शहरातही अनुकरण करण्याची सूचना त्यांनी केली आहे. खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होईल, असे दा. कृ. सोमण यांनी आवर्जून सांगितले. Child astronauts ride bicycles

Child astronauts ride bicycles

विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्याकरिता व शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी किड्स सायक्लोथॉनची संकल्पना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सत्यात आणली. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीला ३०० चे उद्दिष्ट होते, परंतु ते पार करून ४०० पेक्षाही जास्त बालदोस्तांनी सायकलमध्ये भाग घेतला. सुवर्णसूर्य फाउंडेशनने छोटे अंतराळवीर चालवणार सायकल (Little Astronauts on Wheels) अशी संकल्पना मांडली व ती सत्यात उतरली. वेगवेगळ्या खगोलीय संकल्पना विद्यार्थ्यांनी राबवल्या. Child astronauts ride bicycles

तारांगण येथे शनिवारी सायंकाळी विद्यार्थ्यांना बिब नंबर, स्नॅक्स व पहिल्या ३०० जणांना टी-शर्टचे वितरण करण्यात आले. त्या वेळी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे व खगोल अभ्यास केंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार यांनी विद्यार्थ्यांना टेलिस्कोपद्वारे चंद्र, ग्रह, ताऱ्यांची सैर घडवली. या कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात करण्यात आला. कोरोना काळापासून आतापर्यंत लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी ते कार्यरत आहेत. Child astronauts ride bicycles

Child astronauts ride bicycles

रविवारी सकाळी ७ वाजता सर्व बाल अंतराळवीर सायकलिस्ट तारांगण येथे एकत्र आले. सुरवातीला दहा किलोमीटरच्या सायक्लोथॉनमधील सायकलिस्टना पाठवले. तर त्यानंतर ५ किमी अंतरासाठी सहभागी झालेल्या सायकलिस्टना सोडण्यात आले. हॉटेल विवेकचे विक्रांत देसाई, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, हिंद सायकल्सचे मंगेश शिंदे, अजय पानगले यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायक्लोथॉनला प्रारंभ झाला. या वेळी सायकलिस्टच्या चेहेऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. ही स्पर्धा नव्हती तर फक्त सायक्लोथॉन होती. त्यामुळे यात दिलेले अंतर पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच पदक आणि प्रशस्तीपत्र आणि नाश्ता देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बालदोस्तांनी चिठ्ठ्यांमधून काढलेल्या भाग्यवान क्रमांकांना बक्षीसे दिली. क्लबचे सक्रिय सदस्य योगेश मोरे यांच्यामार्फत मिळालेल्या या शालेय साहित्याच्या बक्षीसाने विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला. Child astronauts ride bicycles

Child astronauts ride bicycles

या सायक्लोथॉनसाठी हिरो सायकल्स, हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स, मनहा इंटरनॅशनल, हॉटेल विवेक, आनंदकल्प हॉस्पीटल, हॉटेल फ्लेवर्स आदींचे सहकार्य लाभले. १० किमीसाठी तारांगण ते गजानन महाराज मठ, नाचणे रोड, शांतीनगर व तिथून परत हा मार्ग होता. तर ५ किमीसाठी तारांगण ते शिवाजी स्टेडियमची मागील बाजू, गजानन महाराज मठ व तिथून परत तारांगणपर्यंत मार्ग ठेवला होता. या सर्व मार्गावर नाक्यानाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, सुवर्णसूर्य फाउंडेशन व विविध सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक पोलिस, पालक उपस्थित होते. चार ठिकाणी पाणी, गोळ्या अशा हायड्रेशनची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी रुग्णवाहिका कार्यरत होती. Child astronauts ride bicycles

प्रतिक्रिया

आजच्या उपक्रमाचे खरे विजेते आहेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब. आजच्या उपक्रमामुळे पालक व मुलांच्या आयुष्यातले खरोखरच अविस्मरणीय क्षण अनुभवण्याची संधी मिळाली – रंजन खातू.
किड्स सायक्लोथॉनचे आयोजन अतिशय उत्तम, मुलांच्या मध्ये नवीन जोश उत्साह आला. त्यांच्यासाठी अप्रतिम अनुभव – सीए मुकुंद मराठे.
आजच्या दिवसाची सुरुवात ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन सुरू झाले त्याच दिवसापासून झाली. रजिस्ट्रेशन लिंक सुरू झाल्यापासूनच रत्नागिरी शहरातील गल्ली बोळातून सकाळी व सायंकाळी मुले सायकल चालवताना दिसू लागली. मुलांचा उत्साह अवर्णनीय होता. मुले काळजीपूर्वक मुख्य रस्त्यानेही सायकल चालवताना दिसत होती. हे सायक्लोथॉन यशस्वी होणार याचीच ती झलक होती. मुलांचा व पालकांचा उत्साह प्रचंड होता. मुलांचे व पालकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी असा उपक्रम वेळोवेळी घ्यावा.- रिया राणे.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी किड्स सायक्लोथॉनचे अतिशय सुंदर नियोजन केले. असे उपक्रम दरवर्षी आयोजित करावेत. – विरेंद्र वणजु.
मुलांसाठी इतका अद्भुत आणि संस्मरणीय कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आरसीसी टीमचे खूप खूप आभार! या मुलांच्या सायक्लोथॉनला यशस्वी करण्यासाठी तुम्ही केलेल्या सर्व मेहनतीबद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. आमच्या मुलाची काळजी घेणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आम्ही खूप आभारी आहोत. – अवनी चिखले.
रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या जास्त प्रमाणात मुलांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतला. याचे श्रेय खऱ्या अर्थाने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला दिले पाहिजे. अशा सायक्लोथॉन आपण नेहमी आयोजित कराव्यात. यामुळे मुलांना हेल्दी राहण्याची तसेच सायकलिंग करण्याची प्रेरणा मिळेल. – वर्षा माने.
रत्नागिरीतून सायकल स्पर्धक, खेळाडू तयार व्हावेत यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची तळमळ आहे. – स्वराज मगदूम.
उत्तम नियोजन, शिस्तबद्ध कार्यक्रम, वेळेवर सुरुवात, मनमुराद आनंदाने भरलेला दिवस. दिवसाची सुरुवातच उत्साह आणि उत्सुकतेने भारावलेली होती. सगळ्या टीमचे धन्यवाद. असेच उपक्रम राबवा. पूर्ण रत्नागिरी उत्तम आरोग्याची होवो. देशाची भावी पिढी कमकुवत न राहता ताकदवान बनवुया. – मनिष देसाई.
उत्तम नियोजन, शिस्तबद्ध कार्यक्रम, वेळेवर सुरवात, चविष्ट नाश्ता, थंडगार पेय आणि मनमुराद आनंदाने भरलेला दिवस. दिवसाची सुरवातच उत्साह व उत्सुकतेने भारावलेली होती. सर्व टीमचे धन्यवाद. असेच उपक्रम राबवा. पूर्ण रत्नागिरी उत्तम आरोग्याची होवो. देशाची भावी पिढी ताकदवान बनू दे. – सौ. श्वेता सरपोतदार.
उत्साह शिगेला पोहोचला!!! सौर मंडळाबद्दल उत्सुकता होती. सायकलची चाके रत्नागिरीच्या रस्त्यांवरून फिरत होती… मुलांचे आनंदाने भरलेले चेहरे पाहून खूप छान वाटले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन, प्रत्येक संदेश वेळेवर स्पष्टपणे पोहोचवण्यात आला. सकारात्मकतेने भारलेले उत्तम वातावरण. मुलांना तसेच आम्ही पालकांना खूप आनंद झाला. – प्रशांत अंबडे
“सायक्लोथॉन पूर्ण केल्याबद्दल सर्व सायकलस्वारांचे खूप खूप अभिनंदन. सायकलिंगवरील तुमचे समर्पण, चिकाटी आणि प्रेम खरोखरच प्रेरणादायी आहे. सायकलिंग करत रहा आणि सायकलिंगचा आनंद अनुभवत रहा. या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आणि समाजात सायकलिंगची भावना वाढवल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे व  सुवर्ण सूर्य फाऊंडेशनचे विशेष आभार आणि अभिनंदन!” – मंगेश शिंदे. Child astronauts ride bicycles

Tags: Child astronauts ride bicyclesGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet22
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.