रत्नागिरी, ता. 15 : र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व गुणांचा विकास होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा मानबिंदू असणारा छंदोत्सव दि. १८, १९ व २१ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहे. Chhandotsav at Abhyankar Kulkarni College
विद्यार्थ्यांचा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षी छंदोत्सवाचे आयोजन करण्यात येते. छंदोत्सव म्हणजेच विविध छंदांचा उत्सव’ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे त्यांच्या सुप्त कलागुणांना, कौशल्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना रंगमंचावर पदार्पणाची संधी देणारा हा उत्सव आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, नृत्य, अभिनय, नाद, लय, ताल आणि शब्द या अष्टगुणाना मुक्त व्यासपीठ मिळते व महाविद्यालयामध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी तयार होतात, महाविद्यालयाने राबविलेल्या छंदोत्सव कार्यक्रमाचे हे फलित होय. Chhandotsav at Abhyankar Kulkarni College


छंदोत्सवामध्ये तीन दिवस साजरा होणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा; दि. १८ रोजी सकाळी ८.०० वाजता छंदोत्सवाची सुरुवात वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या अंतिम फेरीतील सामन्यांच्या उद्घाटनाने होईल. याच दिवशी विद्यार्थ्यांनी भरवलेल्या फूड फेस्टचे तसेच विविध प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये फोटोग्राफी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कॅलिग्राफी स्पर्धा, विविध हस्तकलांचे प्रदर्शन इत्यादींचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल व सायंकाळी ५.०० वाजता वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. Chhandotsav at Abhyankar Kulkarni College
दि. १९ रोजी दुपारी ३.०० वाजता शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर घंटानाद सन्मान प्रदान केला जाईल. याबरोबरच फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि छंदोत्सवाचा केंद्रबिंदू असणारी ‘शामराव करंडक; एकांकिका स्पर्धा’ सादरीकरण होईल. याशिवाय विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतील.
दि. २० रोजी सकाळी ८.०० वाजता घंटानाद सन्मान प्रदान केला जाईल. त्यानंतर गीत गायन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम व नंतर विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येइल व छंदोत्सव संपन्न होईल. Chhandotsav at Abhyankar Kulkarni College
छंदोत्सवामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊन आपल्यातील विविध कला कौशल्यांचा अविष्कार घडवतात. छंदोत्सवातूनच सादरीकरणाची सुरुवात करून विद्यार्थी पुढील विद्यापीठस्तर स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश प्राप्त करतात. सदर कार्यक्रम यशस्वीपणे व नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, छंदोत्सव प्रमुख प्रा. वैभव कानिटकर तसेच कला, विज्ञान, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी. शाखांचे विभाग प्रमुख व छंदोत्सवासाठी स्थापन केलेल्या शिक्षकांच्या विविध समित्या यामध्ये स्वागत समिती, बक्षीस समारंभ वितरण समिती, प्रसिद्धी समिती, सूत्रसंचालन समिती, शोभायात्रा समिती, रंगमंच समिती, विविध प्रदर्शन समिती, निमंत्रण समिती, गीतगायन समिती, नृत्य स्पर्धा समिती, तंत्रज्ञान सहाय्य समिती, फॅन्सी ड्रेस व विविध फीलर्स समिती, फूड फेस्ट समिती, क्रीडा समिती इत्यादींच्या नियोजनाखाली सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत. Chhandotsav at Abhyankar Kulkarni College