जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित
रत्नागिरी, ता. 15 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, रत्नागिरी या विद्यालयातील एकूण सात विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये कुस्तीच्या सहभाग घेतला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन मार्फत राज्य क्रीडा दिनानिमित्त सब ज्युनिअर, कुमार गट व खुला गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले होते. यामध्ये विद्यालयातील खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे. Championship Wrestling Tournament
जिल्हास्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये सब जुनिअर गट मुली – रुद्रा चव्हाण 38 kg वजनी गट – सुवर्णपदक, सब जुनियर गट मुले 1. 45 kg वजनी गट – जियान पठाण :- सुवर्णपदक, कुमार गट मुले – 1. 41 kg वजनी गट – मेहबूब शेख :- सुवर्णपदक, 2. 48 kg वजनी गट – राजेश रब्बी :- सुवर्णपदक, 3. 48 kg वजनी गट – रेहान शेख :- रौप्य पदक, 4. 54 kg वजनी गट – तेजस धोत्रे – रोप्य पदक, 5. 54 kg वजनी गट – आयान मुल्ला – कास्य पदक विजयी झाले. Championship Wrestling Tournament
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्वतः कुस्तीपटू असलेले श्री एम. डी. पाटील, क्रीडा मार्गदर्शक सैफुद्दीन पठाण, शिक्षक तानाजी गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमारजी साळुंखे साहेब, सचिव सौ शुभांगी गावडे मॅडम, आजीव सेवक तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, विद्यालयाचे थोर देणगीदार सुनिलशेठ भोंगले, सामाजिक कार्यकर्ते व देणगीदार नितीन जाधव, रोटरी क्लबच्या शाल्मली आंबूलकर, संस्थेचे आजीवसेवक व रत्नागिरी जिल्हा संपर्क निरीक्षक हुसेन पठाण, मुख्याध्यापक श्री ए. डी. पाटील, वसतिगृह अधिक्षक गजानन बागडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रीतम पिलणकर व अशोक पवार, शिक्षक पालक व माता पालक संघ उपाध्यक्ष वैशाली मापुस्कर, शिक्षक अशोक सुतार, अमोल मंडले, दीपक पाटील, स्वप्नाली भूजबळराव, स्वप्नील सावंत, विजय भोसले, राजेंद्र फगरे, रवी बुरुड, लक्ष्मण पवार यांच्याबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे सर्व विद्यार्थी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Championship Wrestling Tournament