गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने दि. 9 व 10 डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद जुदो स्पर्धा व राज्य जुदो स्पर्धा संघ निवड स्पर्धेच आयोजन श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक विद्यालयात करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी स. 11 वा. श्री गुरूदास साळवी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. Championship Judo Tournament at Palshet


या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मनोज जोगळेकर ( पालशेत हायस्कूल), प्रमुख उपस्थिती श्री. प्रशांत पालशेतकर, श्री. निलेश गोयथळे, सौ. मिना ढेरे, श्री. गणेश धनावडे, सौ. संपदा चव्हाण, श्री. महेश वेल्हाळ, सौ. सोनाली हळदणकर, श्री. मनोज बावधनकर, श्री. सुधाकर कांबळे, श्री. यशवंत पालकर, श्री. पंकज बिर्जे, श्री. नरेंद्र नार्वेकर, डॉ. बाळासाहेब ढेरे उपस्थित रहाणार आहेत. Championship Judo Tournament at Palshet
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 10 डिसेंबर रोजी दु. 5 वा. संपन्न होईल. या समारंभाला श्री. संतोष वरंडे, श्री. निलेश मोरे, श्री. संकेत साळवी, श्री. गणेश महाडिक, श्री. अजय नागवेकर, श्री. रमेश साळवी उपस्थित रहाणार आहे. तरी तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धा प्रमुख समिर पवार व स्पर्धा संचालीका सोनाली वरंडे यांनी केले आहे. Championship Judo Tournament at Palshet