गुहागर, ता. 23 : तालुक्यातील मळण केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा जानवळे नं.१ शाळेच्या क्रीडांगणावर दि. २० व २१ डिसेंबर असे दोन दिवस संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये मळण नं. १ शाळेने चमकदार कामगिरी करत सर्वाधिक सांघिक विजेतेपदे व वैयक्तिक पदके प्राप्त करून सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. Champion title to Malan School
यामध्ये खो-खो मोठा गट मुली विजेता संघ, खो-खो लहान गट मुलगे विजेता संघ, लंगडी मोठा गट मुली विजेता संघ कबड्डी, कबड्डी लहान गट मुलगे उपविजेता संघ, कबड्डी लहान गट मुली उपविजेता संघ, खो-खो मोठा गट मुलगे उपविजेता संघ असे सांघिक यश मिळविले. तर वैयक्तिक क्रीडा स्पर्धा प्रकारात तन्वी संदीप धामणस्कर हिने उंच उडी प्रथम क्रमांक, निलेश्वरी अनिल धामणस्कर हिने १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, आर्या सुशील नाटुस्कर हिने लांब उडी प्रथम क्रमांक, उंच उडीत द्वितीय क्रमांक व १०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक, गोळा फेकमध्ये समर्थ जितेंद्र पाटील याने द्वितीय क्रमांक, थाळीफेकमध्ये सृष्टी योगेश धामणस्कर द्वितीय क्रमांक, ५० मीटर धावणे प्रकारात अविष्कार सचिन धामणसकर याने प्रथम क्रमांक तसेच उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक व थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक, भूमी महेंद्र कोतवडेकर हिने उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक असे यश मिळविले. Champion title to Malan School


हिवाळी क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये खेळणाऱ्या स्पर्धकांसाठी वैभव गंगाराम बागवे यांनी वडील कै. गंगाराम भिकाजी बागवे गुरुजी यांच्या स्मरणार्थ २५ ड्रेस किट्स पुरवले. तसेच सन १९९७/९८ चे माजी विद्यार्थी यांनी खेळाचे २५ ड्रेस किट्स देणगी दिले. सरपंच नारायण गुरव यांनी रु.१००१/- रोख पारितोषिक दिले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी वाहतुकीची जबाबदारी पार पाडली. देणगीदारांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसे दिली. एकूणच विद्यार्थ्यांच्या या चांगल्या कामगिरीचे कौतुक मळण गावातील ग्रामस्थांनी उत्साहाने केले. सलग दुसऱ्या वर्षी शाळेने हे सर्वसाधारण विजेतेपद पटकावून क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली. याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. Champion title to Malan School