रत्नागिरी, ता. 18 : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरानजीकच्या काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री महालक्ष्मी देवस्थानने मंदिरात २२ जानेवारी रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. Ceremony at Kajarghati Mahalaxmi Temple
सोमवारी २२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व सामूहिक श्री राम नामजप होईल. दुपारी ११ ते १ वेळेत श्री राम जन्मोत्सव किर्तन ह.भ.प. सौ. रमा प्रशांत ठाकूर करतील. त्यांना तबलासाथ प्रसाद पटवर्धन, हार्मोनियमसाथ ओजस करकरे करतील. दुपारी १ ते १.३० या वेळेत आरती मंत्रपुष्प (सामुहिक) होईल. दु. १.३० ते ३ या वेळेत श्री रामांचा शिधा महाप्रसाद वितरित होईल. दु. ३ ते ४ वाजता विद्यार्थी बाल-मित्रांचे अनुषंगिक कार्यक्रम व गुणगौरव समारंभ होईल. सायंकाळी ४ ते ७ वेळेत स्थानिक भजने व समस्त ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित हळदी कुंकू समारंभ होईल. सायं. ७ ते ७.३० वाजता उस्फूर्त व प्रेक्षणीय दीपोत्सव सोहळा रंगणार आहे. सायंकाळी ७.३० ते ८ वाजता धुपारती होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. Ceremony at Kajarghati Mahalaxmi Temple
यथाशक्ती दान देऊन या आनंदोत्सवात सर्व भक्तांनी सहभागी होऊन आपल्या सर्वांच्या आनंदात खारीचा वाटा उचलावा, अशी विनंती श्री महालक्ष्मी देवस्थान अध्यक्ष व विश्वस्त, उत्सव समिती, सभासद ग्रामस्थ आणि ग्रामस्थ बंधू-भगिनींनी केले आहे. Ceremony at Kajarghati Mahalaxmi Temple