गुहागर, ता. 18 : पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांच्या वतीने पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० व दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या दोन दिवशीय स्पर्धा ६ वर्षाने तवसाळ तांबडवाडी मध्ये संपन्न होणार आहेत. Center level competition at Tavasal
या क्रिडा स्पर्धाचे उत्तम नियोजन तवसाळ तांबडवाडी मधील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवा वर्ग आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तसेच पडवे केंद्राच्या एकुण १३ शाळा मधुन शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग आणि पालक उपस्थित रहाणार आहेत. तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरीत ग्रामस्थांनी येणाऱ्य़ा सर्व शाळांमधील मुलांनसाठी स्वच्छता करत मैदानाची पुर्व तयारी केली आहे. Center level competition at Tavasal
या स्पर्धा सांघिक क्रिडा प्रकार लहान गट मोठा गट खोखो, कबड्डी, लंगडी, क्रिकेट स्पर्धा, वयक्तीत खेळ, लांब उडी, उंच उडी, थाली फेक, धावणे, गोळा फेक हे प्रकार खेळवले जाणार आहेत. यामध्ये सर्व जास्त गुण संपादन करणारी कोणती शाळा ठरणार आहे. तरी तवसाळ तांबडवाडी मधील ग्रामस्थ व शाळा कमिटी च्या वतीने सर्व क्रिडा रशिकांनी स्पर्धेसाठी उपस्थित रहावे, ही नम्र विनंती केली आहे. Center level competition at Tavasal