संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी ‘वीर बालदिन’ साजरा झाला. पुष्पगुच्छ देऊन बालकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Celebrating ‘Veer Baldin’ at Talvali School
या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच शासनाने दिलेल्या लिंकच्या माध्यमातून प्रोजेक्टर लावून शासनाने आयोजित केलेला कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला. जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकारयांचे स्वागत केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीनाथ कुळे यांनी प्रास्ताविकेतून या दिवसाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर मुख्याध्यापक थरकार यांनी वीर बालदिनाचे महत्त्व व माहिती दिली. शीख धर्माचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांना वीर मरण आले. त्यांचे स्मरण व्हावे. तसेच बालकांचा सन्मान झाला पाहिजे. त्याविषयी विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळावी, हा उद्देश या मागे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके, श्री देवरुखकर, श्री. कुळे तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Celebrating ‘Veer Baldin’ at Talvali School