गुहागर, ता. 04 : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी शहर स्तर नगरपंचायत गुहागर संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर शहरातील बचत गट महिला सदस्यांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. Celebrating the anniversary of Hirakani Sangh
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण आणि प्रशासकीय अधिकारी श्री अनंत मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून संघाच्या अध्यक्ष रश्मी रवींद्र पालशेतकर यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर नगरपंचायतचे कर निरीक्षक सचिन जाधव, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, इंजिनीयर श्री. भूतल, श्री पुराणिक, श्री. खाडे, जनार्दन साटले, प्रीतम वराडकर, श्री. असगोलकर, नवजे कर, श्रीम. घाडगे, ओंकार लोखंडे यांचाही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. Celebrating the anniversary of Hirakani Sangh
शहर स्तर संघाचा दुसरा वर्धापन दिन संघाच्या सर्व कार्यकारणी सदस्य आणि बचत गट सदस्य यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी हिरकणी शहर स्तर संघाच्या व्यवस्थापक सौ. नेहा आरेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सौ. रश्मी पालशेतकर यांनी शहर स्तर संघाच्या कार्यप्रणाली बाबत माहिती दिली. गुहागर शहरातील सर्व बचत गट मिळून शहर तर संघाची स्थापना सन 2022 रोजी झालेली आहे. शहरस्तर संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय योजना, महिला बचत गट यांना उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती, प्रशिक्षण, कर्जपुरवठा, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी केंद्रशासनाच्या कर्जांची माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांना, बचत गटांना उद्योगात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पीएम स्वनिधी, विश्वकर्मा योजना, अनेक विविध योजनांचा लाभ महिलांना करून देत आहोत. सामाजिक व स्वच्छता उपक्रमात हिरकणी शहर स्तर संघाचा सहभाग आहे. विविध ठिकाणी बचत गटांचे स्टॉल लावून मार्केटिंगसाठी बचत गट महिलांना सहकार्य करीत आहोत. गुहागर हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे आपल्या शहरातील बचत गटांच्या उत्पादित केलेल्या मालाला मार्केट मिळावं यासाठी गुहागर नगरपंचायत यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्टॉल मिळावेत, अशी मागणी सौ. रश्मी पालशेतकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली. Celebrating the anniversary of Hirakani Sangh
संस्थेचे कार्यालयासाठी जागा देऊन नगरपंचायत यांनी दिलेले सहकार्याबरोबरच बचत गट यांना उत्पादित माल यासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावे, अशी करण्यात आली. गुहागर शहरातील बचत गट हे कोकण उत्पादने, विविध हस्त कौशल्यच्या वस्तू, मातीच्या वस्तू, नारळ आणि काथ्यापासून तयार केलेल्या शोभिवंत वस्तू, विविध खाद्यपदार्थ, विणकाम, गोधडी शिवणकाम, या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. तरी त्यांचा मार्केटचा स्त्रोत वाढावा यासाठी हिरकणी शहर स्तर संघ प्रयत्नशील आहे. नगरपंचायत यांनीही या सर्व बाबी लक्षात घेऊन शहर स्तर संघाला सहकार्य करावे. अशी विनंती करण्यात आली. यावेळी संपूर्ण गुहागर नगरपंचायत कर्मचारी वृंद, हिरकणी शहर स्तर संघाच्या संपूर्ण कार्यकारणी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रश्मी पालशेतकर , सचिव सौ. स्वाती कचरेकर, सौ. वराडकर, सौ. अनिता राऊत, सौ. दीक्षा माटल, सौ. सिद्धी पावसकर, सौ. गीतांजली पोमेंडकर, आणि सर्व बचत गटातील सदस्य उपस्थित होत्या. Celebrating the anniversary of Hirakani Sangh