गुहागर, ता. 25 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा १ ला वर्धापनदिन सोहळा मंगळवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ येथे सौ. संगीता हळदणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. संस्थेने एक वर्षाच्या प्रवासात दिव्यांगांना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, यू डी आय डी कार्ड, संजीव गांधी निराधार योजना हे कार्यक्रम राबविले. या कार्यक्रमानिमित्त पालकत्व दाखला मिळण्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील पुढील माहिती नोंदणी केलेल्या दिव्यांगांना संस्थेकडून कळविण्यात येणार आहे. Celebrating the anniversary of Divyang Sanstha
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/11/add-4.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/11/add-4.jpg)
या कार्यक्रमाला गुहागर तालुक्याच्या तहसिलदार मा. सौ. प्रतिभा वराळे मॅडम, गुहागर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. गावणकर साहेब, गुहागर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. राजेशजी बेंडल, सौ. स्नेहा संतोष वरंडे, श्री. राज विखारे, बचत गट मार्गदर्शिका सौ. आंबोकर मॅडम, गुहागर तालुका अपंग संस्थेचे अध्यक्ष श्री. रावणंग सर या मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. दीपकजी कनगुटकर, श्री. किरणजी खरे, श्री. निलेशजी मोरे व श्री. अमोल गोयथळे आदी मान्यवरांनी मोबाईलद्वारे कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर लोखंडे, खजिनदार श्री. अनंत घोरपडे, सदस्य श्री. अनिल चाळके, सौ. कोमल सांगळे, सौ. अपर्णा जोशी व सर्व दिव्यांग बंधू भगिनीं तसेच गुहागर नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री. भरत चंद्रकांत कदम यांनी केले. Celebrating the anniversary of Divyang Sanstha