गुहागर, ता. 20 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये ढोल ताश्यांच्या तालावर लेझीम नृत्य, देशाचा जयजयकार, देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. मान्यवर व विद्यार्थ्यांची भाषणेही झाली. सकाळी ९ वा. बालसभा संपन्न झाली. Celebrating Independence Day in Tavsal school
श्री दिपक तुकाराम कुळये यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती गंगाय तुकाराम कुळये यांच्या हस्ते सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना भेट वस्तू दिल्या. आणि शिक्षकांना पेन वाटप केले Dj सचिन कुळये यांनी कार्यक्रमाला रंग भरण्यासाठी तिरंगी फुगे व झेंडे विद्यार्थींना देऊन उत्साह वाढवला, शेवटी खाऊ वाटपाचा कार्यक्रम करू कार्यक्रमाची सांगता केली. Celebrating Independence Day in Tavsal school
यावेळी शाळा कमिटी शिक्षक पालक अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्ष : वैष्णवी दिपक निवाते, माजी- सरपंच सौ. नम्रता वसंत निवाते ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. कृष्णा सोनू वाघे, श्री महादेव भिकु करटे, श्री महादेव वाघे श्रो चंद्रकांत निवाते, श्री. काशिनाथ कुळये, श्री बारकू निवाते, श्री. बबन कुरटे, श्री. मंगेश पारदळे, श्री. दिनेश कुरटे, सर्व ग्रामस्थ महिला युवा वर्ग विद्यार्थिनी उपस्थित होते. शाळांमधील शिक्षक वृंद कु.अंकुश मोहिते, श्री संदिप भोये, श्री.गोकुळ गोविळ, कु.साईनाथ पुंजारा यांनी आलेल्या सर्व ग्रामस्थ महिला मंडळ युवा वर्ग विद्यार्थिनी उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद यांचे शाळेच्या वतीने आभार व धन्यवाद मानले. Celebrating Independence Day in Tavsal school