गुहागर, ता. 20 : तालुक्यातील असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर वाहनाने केबल ओढल्याने केबलचा फटका बसून यामध्ये सतेश किसन घाणेकर याचा मृत्यू झाला होता. तर तिघेजण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनीच्या संचालक व इंजिनिअर्स सह वाहन चालवणाऱ्या चालकावर मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case registered in case of accidental death
गुहागर तालुक्यातील असगोली येथील मयत सतेश किसन घाणेकर (वय 38) राहणार असगोली हुंबरवाडी हे आपल्या लहान मुलासहित व आपल्या सहकाऱ्यासमवेत दि. 18 एप्रिल 2024 रोजी एक्टिवा गाडीने जात असताना असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर चार चाकी वाहनाने इंटरनेट केबल ओढत नेल्याने त्याचा फटका बसून दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये सतेश घाणेकर यांचा 19 एप्रिल 2024 रोजी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. तर या अपघातामध्ये श्रीवांश सतेश घाणेकर, पांडुरंग सहदेव घर्वे त्याचबरोबर पाठीमागून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या स्नेहल सुभाष रायकर असे तिघेजण जखमी झाले होते. Case registered in case of accidental death
या प्रकरणी घाणेकर यांच्या पत्नीने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूस व दुखापतिस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेचा तपास उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांच्याकडे होता. या तपासामध्ये अखेर 17 जून 2024 रोजी दुपारी 2.18 वाजता पीपीएम इलेक्ट्रिकल अँड सोलर सर्विस या बीड स्थित कंपनीचे संचालक व इंजिनियर्स त्याचबरोबर चिखली येथील वाहन चालक पारस विलास पवार यांच्यावर भा. दं. वि. सं. कलम 304 (अ), 337, 34 प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case registered in case of accidental death