गुहागर, ता. 28 : असगोली वरचीवाडी एकता वर्धक मंडळ मुंबई व स्थानिक मंडळ यांच्या वतीने पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन माजी आमदार मा. विनयजी नातू यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम वरचीवाडी समाज मंदिर येथे दि. 24 डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई कळझुणकर, नरेश पवार, सौ. ज्योती परचुरे, विकास मालप, सौ. निता मालप, संजय मालप, संतोष मावळंकर, संतोष सांगळे उपस्थित होते. Calendar release ceremony at Asgoli


समारंभाचे प्रास्ताविक प्रमोद घुमे यांनी केले. यावेळी त्यांनी दिनदर्शिका तयार करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. व मंडळाच्या प्रमुख अडचणी सांगितल्या. तसेच हे एकता वर्धक मंडळ कसे उभे राहिले याबाबत माहिती दिली. या दिनदर्शिकेसाठी मुंबई मंडळ व स्थानिक मंडळ यांनी खूप मेहनत घेतली. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रदिप घुमे यांचा सत्कार विनयजी नातू यांनी केला. तर ग्रामपंचायत सदस्य केशव घुमे यांचा सत्कार नरेश पवार यांनी केला. Calendar release ceremony at Asgoli


या कार्यक्रमात मा. माजी आमदार विनयजी नातू यांनी वाडीबद्दल केलेल्या कामाची माहिती सांगितली. तसेच त्यांनी अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याचाही शब्द दिला. तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रदिप घुमे यांनी विनयजी नातू यांना सांगितले की, वाडीच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला साथ देवू. तसेच आमची जी उरलेली बांधी आहे. ती पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर घुमे यांनी विनयजी नातू यांचे पऱ्याची बांधी कामाबाबत विशेष सत्कार करण्यात आला. तसेच साई कळझुणकर यांचेही आभार मानले. Calendar release ceremony at Asgoli


या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी साई कळझुणकर, नरेश पवार, सौ. ज्योती परचुरे, विकास मालप, सौ. निता मालप, संजय मालप, संतोष मावळंकर तसेच स्थानिक मंडळाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित उपसरपंच प्रदिप घुमे, स्थानिक मंडळाचे सल्लागार व ग्रामपंचायत सदस्य केशव घुमे, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष हर्षद घाणेकर, मुंबई मंडळाचे सल्लागार अनंत घुमे स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्षा वृषाली घुमे, श्री देव भैरी व्याघ्राबरी देवस्थान असगोलीचे अध्यक्ष गजानन धावडे, कुणबी उन्नती मंडळ असगोलीचे अध्यक्ष उमेश कावणकर व बहुसंख्य वाडीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. प्रणय घुमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. Calendar release ceremony at Asgoli



