• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली वरचीवाडी येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

by Mayuresh Patnakar
December 28, 2023
in Guhagar
81 1
0
Calendar release ceremony at Asgoli
159
SHARES
455
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : असगोली वरचीवाडी एकता वर्धक मंडळ मुंबई व स्थानिक मंडळ यांच्या वतीने पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन माजी आमदार मा. विनयजी नातू यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम वरचीवाडी समाज मंदिर येथे दि. 24 डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई कळझुणकर, नरेश पवार, सौ. ज्योती परचुरे, विकास मालप, सौ. निता मालप, संजय मालप, संतोष मावळंकर, संतोष सांगळे उपस्थित होते. Calendar release ceremony at Asgoli

Calendar release ceremony at Asgoli

समारंभाचे प्रास्ताविक प्रमोद घुमे यांनी केले. यावेळी त्यांनी दिनदर्शिका तयार करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. व मंडळाच्या प्रमुख अडचणी सांगितल्या. तसेच हे एकता वर्धक मंडळ कसे उभे राहिले याबाबत माहिती दिली. या दिनदर्शिकेसाठी मुंबई मंडळ व स्थानिक मंडळ यांनी खूप मेहनत घेतली. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रदिप घुमे यांचा सत्कार विनयजी नातू यांनी केला. तर ग्रामपंचायत सदस्य केशव घुमे यांचा सत्कार नरेश पवार यांनी केला. Calendar release ceremony at Asgoli

Calendar release ceremony at Asgoli

या कार्यक्रमात मा. माजी आमदार विनयजी नातू यांनी वाडीबद्दल केलेल्या कामाची माहिती सांगितली. तसेच त्यांनी अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याचाही शब्द दिला. तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रदिप घुमे यांनी विनयजी नातू यांना सांगितले की, वाडीच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला साथ देवू. तसेच आमची जी उरलेली बांधी आहे. ती पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर घुमे यांनी विनयजी नातू यांचे पऱ्याची बांधी कामाबाबत विशेष सत्कार करण्यात आला. तसेच साई कळझुणकर यांचेही आभार मानले. Calendar release ceremony at Asgoli  

Calendar release ceremony at Asgoli

या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी साई कळझुणकर, नरेश पवार, सौ. ज्योती परचुरे, विकास मालप, सौ. निता मालप, संजय मालप,  संतोष मावळंकर तसेच स्थानिक मंडळाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित उपसरपंच प्रदिप घुमे, स्थानिक मंडळाचे सल्लागार व ग्रामपंचायत सदस्य केशव घुमे, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष हर्षद घाणेकर, मुंबई मंडळाचे सल्लागार अनंत घुमे स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्षा वृषाली घुमे, श्री देव भैरी व्याघ्राबरी देवस्थान असगोलीचे अध्यक्ष गजानन धावडे, कुणबी उन्नती मंडळ असगोलीचे अध्यक्ष उमेश कावणकर व बहुसंख्य वाडीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. प्रणय घुमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. Calendar release ceremony at Asgoli

Calendar release ceremony at Asgoli
Calendar release ceremony at Asgoli

Tags: Calendar release ceremony at AsgoliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.