गुहागर, ता. 04 : श्री गणेश क्रीडा मंडळाच्या 25 वा रौप्य महोत्सवा निमित्ताने दि. 30 रोजी पहिल्यांदाच दिनदर्शिका 2024 चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हा सोहळा मंडळाचे अध्यक्ष अभिजीत कृष्णा आग्रे, उपाध्यक्ष प्रशांत गणपत गावडे, सेक्रेटरी सागर महादेव आग्रे, उपसेक्रेटरी सागर नामदेव गावडे, खजिनदार रामचंद्र मालू सोलकर, सुशांत तानाजी आग्रे, उप खजिनदार सचिन सिताराम आग्रे याच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. Calendar publication ceremony at Bhatgaon
श्री गणेश क्रीडा मंडळ हे क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा असंख्य कार्यक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. तसेच हॉस्पिटलमधील लोकांना मदत किंवा लोकपयोगी कामासाठी मदतीसाठी नेहमी तयार असते. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी श्री प्रल्हाद मोरे, श्री सचिन शेठ बाईत, ज्ञानेश्वर निकम, प्रभाकर रसाळ तसेच राजेंद्र साळवी अशा असंख्य लोकांनी मंडळाला लाख मोलाच सहकार्य केले. Calendar publication ceremony at Bhatgaon
या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी माजी अध्यक्ष अर्जुन गावडे माननीय मुरलीधर सोलकर, सुशांत अनिल विलेश व मंडळाच्या असंख्य सभासदांनी आपापलं 100% योगदान देऊन दिनदर्शिका उद्घाटन सोहळा संपन्न करून दिनदर्शिका घरोघरी पोहोचवण्याचे प्रयत्न केले. याबाबत सर्व सभासद आणि हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. Calendar publication ceremony at Bhatgaon