१ लाख २१ हजार ५०० रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी
गुहागर, ता. 7 : तालुक्यातील मुंढर पुर्व आग्रेवाडीतील वसंत रामचंद्र आग्रे यांचे घर अज्ञात चोरटयांनी फोडले. घरातील विविध वस्तू चोरल्या. त्यांची एकूण किंमत १ लाख २१ हजार ५०० रुपये आहे. सदर घटना 15 जुलै 2024 ते 5 नोव्हेंबर 2024 दरम्यान घडली. याबाबत बुधवारी गुहागर पोलिस ठाण्यात 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8.00 वा. अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Burglary at Mundhar Angre Wadi
फिर्यातदार वसंत आग्रे हे मुळचे मुंढर पुर्व आग्रे वाडीतील असले तरी सध्या कल्याण मुंबई येथे रहातात. १५ जुलै ते ५ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरटयांनी घराच्या दरवाजाला लावलेले कुलुप तोडून घरातील २५ हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा फ्रीज, २५ हजार रुपये किंमतीचा टीव्ही, २० हजार रुपये किंमतीचे वॉशिंग मशीन, ३५ हजार रुपये किंमतीचा इन्व्हरर्टर सेटअप, १० हजार रुपयांचा स्टॅबिलायझर, २५०० रुपये किंमतीचा टेबल फॅन, १ हजार रुपये किंमतीची शेगडी आणि ३ हजार रुपये किंमतीचा सिलेंडर असा एकूण १ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. अज्ञात चोरटयांवर भारतीय न्याय संहिता कलम ३३२(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Burglary at Mundhar Angre Wadi