कोकण प्रवासी महासंघ व पराग कांबळे मित्र मंडळ यांच्या वतीने कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
गुहागर, ता. 26 : कोकण प्रवासी महासंघ व पराग पांडुरंग कांबळे मित्र मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व कोकण प्रवासी महासंघाचे संघटक पराग कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. Book and Fruit Distribution Program


या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर मयेकर, पत्रकार गणेश किर्वे, रमाकांत खेडेकर, अभय हळये, प्रशांत कांबळे, मनोज पावसकर ,सुभाष रजपूत, गुहागर तालुका महिला अध्यक्ष अमृता जोशी, गोपाळ झगडे गजानन मांडवकर, रामकृष्ण महाडिक, गजानन रहाटे, प्रतिभा उर्फ नानी रहाटे तसेच विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांच्या निवासस्थानी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवोशी, पालशेत येथील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. तसेच गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढेरे यांचा कोकण प्रवासी महासंघ ता. गुहागर व पराग पांडुरंग कांबळे मित्र मंडळ ता. गुहागर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. Book and Fruit Distribution Program


गुहागर तालुक्यासह जिल्हाभरातून अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पराग कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गुहागर तालुका प्रेस क्लब अध्यक्ष दिनेश चव्हाण, उपाध्यक्ष गणेश किर्वे, दिलीप जाधव, निसार खान, सुरेश आंबेकर, योगेश तेलगडे, उमेश शिंदे, अमोल पोवळे, विनोद चव्हाण व तालुक्यातील सर्व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुहागर एस.टी.आगार येथील कर्मचारी व सफाई कामगार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पावस्कर यांनी केले तर आभार कोकण प्रवासी महासंघ ता. गुहागर महिला अध्यक्ष अमृता जोशी यांनी मानले. Book and Fruit Distribution Program