कोणी व्यक्ती हरवले असेल, बेपत्ता असेल त्यांनी गुहागर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा
गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील देवघर येथील मंदिराजवळील एका ठिकाणी आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की आत्महत्या वा घातपात याबाबत परिसरात एकच चर्चा सुरु आहे. Body of unknown person at Devaghar
गुहागर-चिपळूण मार्गावरील देवघर येथील नदीच्या कडेला हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह काही नागरिकांना दिसून आला. साधारणतः ३० ते ३५ वय असलेल्या व्यक्तीचा हा मृतदेह असून १५ दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून या परिसरातील जर कोणी व्यक्ती हरवले असेल किंवा बेपत्ता असेल त्यांनी गुहागर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नलावडे व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत. Body of unknown person at Devaghar