• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समर्थ भंडारी पतसंस्थेला ब्लू रिबन पुरस्कार जाहीर

by Guhagar News
December 14, 2024
in Guhagar
85 1
0
Blue Ribbon Award to Samarth Bhandari Institute
167
SHARES
477
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अँबी व्हॅली लोणावळा येथे होणार पुरस्कार प्रदान समारंभ

गुहागर, ता. 14 : अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांच्याकडून देण्यात येणारा बँको ब्लू रिबन २०२५ पुरस्कार श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे.  १५० ते २०० कोटी ठेवी विभागातील हा पुरस्कार दि. २९, ३० व ३१ जानेवारी २०२५ रोजी अँबी व्हॅली लोणावळा येथे होणा-या सहकार परिषदेमध्ये प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली.  Blue Ribbon Award to Samarth Bhandari Institute

सन २००२ मध्ये श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून श्री. प्रभाकर आरेकर यांचे मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षे संस्थेने नियोजनबध्द कामकाज केले आहे. संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात १८ शाखा व २ कलेक्शन सेंटर कार्यरत असुन रत्नागिरी जिल्हयातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून नाव लौकिक प्राप्त केला आहे. संस्थेच्या दि. ३० नोव्हेंबर २०२४ अखेर एकुण ठेवी रु.१९५ कोटी ४१ लाख, एकुण कर्जव्यवहार रू.१६२ कोटी ८६ लाख वसुल भागभांडवल रू.१२ कोटी ८६ लाख, निधी रू. १७ कोटी ४७ लाख, गुंतवणूका रू. ६९ कोटी ४५ लाख, एकुण नफा रू. १२ कोटी ३५ लाख व संमिश्र व्यवयाय रु. ३५८ कोटी २७ लाख असून संस्थेच्या कर्ज थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच संस्थेने एनपीओचे प्रमाण शुन्य टक्के राखलेले आहे. संस्थेला स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ असून संस्थेने सभासदांना मार्च २०२४ अखेर १५% लाभांश दिलेला आहे. Blue Ribbon Award to Samarth Bhandari Institute

संस्थेचे कामकाज, पारदर्शकता, विश्वासार्हता, सुरक्षितता व व्यावसायिकता या चार तत्वांवर सुरू असून संस्थेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Blue Ribbon Award to Samarth Bhandari Institute

Tags: Blue Ribbon Award to Samarth Bhandari InstituteGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.