गुहागर, ता. 18 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय (MPCOE) वेळणेश्वर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत “रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन बी. के. एल वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. सर्वांनी रक्तदान करून समाजसेवेत योगदान देण्याचे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Blood donation camp at Varaneshwar college
रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच परिसरातील नागरिक रक्तदान करू शकतात. या शिबिरात सामान्य आरोग्य तपासणीसाठी विविध प्रकारच्या मोफत वैद्यकीय तपासण्यांची सोय उपलब्ध आहे, ज्यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, नेत्र रोग, स्रीरोग, हाडांचे रोग इत्यादींची तपासणी केली जाईल. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सल्ला देखील दिला जाणार आहे. Blood donation camp at Varaneshwar college


या शिबिरात परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांच्या वतीने करण्यात येत आहे. रक्तदान ही एक पवित्र आणि जीवनदायिनी सेवा आहे, ज्यातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. याशिवाय आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आरोग्याची माहिती मिळेल व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी,: [९०९६७९५०८७] या नंबरवर संपर्क साधावा. Blood donation camp at Varaneshwar college