१०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!
गुहागर, ता. 17 : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी, सत्संग भवन, पाचेरीसडा (मोंभार) येथे नुकतेच संपन्न झाले.” रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे.!”.” रक्त दिल्याने रक्त वाढते..!”, “रक्त नाडियोंमें बहे, नालियोंमें नही..!” या बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या संदेशाला सार्थकता देऊन या भव्य दिव्य रक्तदान शिबीरात ग्रामिण भागातील १२५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यामध्ये १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. Blood Donation Camp at Pacherisada


या रक्तदान शिबीराचे उदघाटन ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था कोळवली पंचक्रोशी तालुका गुहागर या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शांताराम वाघे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी रत्नागिरीचे क्षेत्रीय संचालक आद. उमेश भागडे, त्रिमूर्ती सेवा ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संतोष डिंगणकर, सचिव संतोष आंब्रे, मंडळाचे कार्यकर्ते दिलीप डिंगणकर, धर्मानंद यादव, कोळवली गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल वाघे यांचेसह गावकरी, मानकरी,वाडी प्रमुख तसेच महिला – पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. Blood Donation Camp at Pacherisada


या रक्तदान शिबिराच्या आदल्या दिवशी पंचक्रोशीतील गावातून, वाडीतून प्रभातफेरीच्या माध्यमातून साथ संगत आणि सेवा दलाच्या सदस्यांनी रक्तदान करण्याबाबत जनजागृती अभियान राबविले आणि संत निरंकारी मिशनचे प्रसिद्धी पत्रक घरोघरी वाटप केले. तसेच श्री. शांताराम वाघे यांनी संत निरंकारी मिशनचे आणि गावातील तसेच पंचक्रोशीतील संत – महापुरुषांचे सामाजिक योगदानावर दृष्टीक्षेप टाकून कौतुक करून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी तळवली गुहागर शाखेचे प्रमुख दत्तात्रय किंजळे यांनी सर्व रक्तदात्यांचे आणि शासकीय रक्तपेढी रत्नागिरीच्या संपूर्ण टिमचे आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळवली – गुहागर युनिट नं. ८९६ चे संचालक चंद्रकांत कुळ्ये तसेच सेवादल सदस्य आणि पाचेरीसडा (मोंभार) सत्संगचे प्रबंधक शांताराम डिंगणकर, पाचेरीसडा (मोंभार) संत – महापुरुषांनी आयोजन केले होते. Blood Donation Camp at Pacherisada