आप्पा कदम “रक्तदान रत्न” तर सचिनशेठ कारेकर “आबलोली भूषण” पुरस्काराने सन्मानित
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, निस्वार्थी समाज सेवक आणि आपल्या जीवनात रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून अनेकांना जिवदान देणारे “जिवनदाता “, “आबलोली भूषण” अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अनेकांसाठी देवदूत ठरलेले आबलोली गावचे सुपूत्र विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांनी रक्तदान शतकपूर्तीसाठी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीरात ६५ व्या वर्षी १०० व्या वेळा रक्तदान करुन रक्तदानाची शतकपूर्ती साजरी केली. याची दखल घेऊन ग्रामपंचायत आबलोली यांनी आप्पा कदम यांना “रक्तदान रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित केले. Blood Donation Camp at Aabloli


तसेच आबलोली गावचे सुपूत्र, गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले प्रगतशिल शेतकरी सचिनशेठ कमलाकर कारेकर यांना “आबलोली भूषण” पुरस्काराने महारक्तदान शिबीरात दुपारच्या सत्रात गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे गौरवण्यात आले. Blood Donation Camp at Aabloli


या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.वैष्णवी नेटके या होत्या. आबलोलीच्या आप्पा कदम आणि सचिनशेठ कारेकर यांना हे दोन्हीं पुरस्कार पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी आप्पा कदम यांनी प्रत्येकाने परिश्रम, मेहनत करा. मी १०० वेळा रक्तदान केले आहे. रक्त दिल्याने कुणाला तरी जिवदान मिळते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकवेळा रक्तदान करा रक्तदान केल्याने नुकसान होत नाही आपल्या शरीरात शुद्ध रक्त तयार होते. असा संदेश आप्पा कदम यांनी दिला तर सचिनशेठ कारेकर हे सत्काराने भाऊक होऊन त्यांनी गावाचे ऋण व्यक्त करुन शेती करा शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करा, यश निश्चित मिळते, शेती शिवाय तरणोपाय नाही असा संदेश सचिनशेठ कारेकर यांनी दिला. Blood Donation Camp at Aabloli
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड, कृषी अधिकारी गजेंद्र पौणिकर, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, सत्कार मुर्ती आप्पा कदम, सौ. विभावरी कदम, सचिनशेठ कारेकर, सौ.स्वरुपा कारेकर, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, आबलोलीचे ग्राममहसूल अधिकारी विनोद जोशी, आर. पी. आमचे गुहागर तालुका अध्यक्ष संदिप कदम, यशवंत पागडे, पोलिस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, ग्रामपंचायत सदस्यां सौ. वृषाली वैद्य, सौ. शैला पालशेतकर, सौ.रुपाली कदम, सौ.पायल गोणबरे, श्रीमती. नम्रता निमूणकर, शरद साळवी आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच आबलोली गावातील ग्रामस्थ शिक्षक बंधू- भगिनी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, गावकरी, वाडीप्रमूख, बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास गायकवाड यांनी केले. Blood Donation Camp at Aabloli