जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी, ता. 30 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतात. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. Blockade of Thirty-first in Ratnagiri district
नागरिकांना आवाहन करताना पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, पर्यटकांनी आनंद लुटावा, कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या काळात जास्तीत जास्त वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. म्हणून ज्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे अशा ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्यात येणार आहेत. वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. Blockade of Thirty-first in Ratnagiri district
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरद्वारे वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे. अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी काही टोळक्यांद्वारे महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडतात. काही गुन्हे घडतात यासाठी साध्या वेशात महिला व पुरुष पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अतिउत्साहामुळे आणि पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे अनेक तरुण वेगवेळ्या समुद्राच्या पाण्यात उतरतात. त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि एखादी दुर्घटना घडते. हे टाळण्यासाठी किनारपट्टीवर सुरक्षागार्ड नेमले आहेत. तेथील ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही कुलकर्णी म्हणाले. Blockade of Thirty-first in Ratnagiri district