• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपाचे कुवारबाव येथे होतंय भव्य कार्यालय

by Guhagar News
April 8, 2024
in Ratnagiri
52 0
0
BJP's grand office at Kuwarbav
102
SHARES
290
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

रत्नागिरी, ता. 08 : भारतीय जनता पक्षाचे भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालय शहराजवळील कुवारबाव येथे साकारण्यात येत आहे. स्वमालकीच्या या कार्यालयाचे भूमीपूजन भाजपाचे नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. BJP’s grand office at Kuwarbav

कुवारबाव येथे मुख्य महामार्गानजीकच लागून अरिहंत प्राईम या इमारतीच्या आवारात सुसज्ज असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. सुमारे २४ हजार चौरस फुटांचे हे कार्यालय असून तीन मजली इमारत आहे. यात दोन सभागृह, कार्यालय विभाग, भाजपाच्या महनीय व्यक्तींसाठी निवास, पार्किंग, लिफ्ट अशा सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे. कोकणात भाजपाची ताकद वाढत असल्याचे हे लक्षण आहे. BJP’s grand office at Kuwarbav

यावेळी भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरचिटणीस सतेज नलावडे, सचिन वहाळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, अनिकेत पटवर्धन, मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे आणि दादा दळी, शहराध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषीकेश केळकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शिल्पा मराठे, धनंजय मराठे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश शेवडे, नंदू चव्हाण, विक्रम जैन, प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, नितीन जाधव, प्रवीण देसाई, लीलाधर भडकमकर यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. BJP’s grand office at Kuwarbav

Tags: BJP's grand office at KuwarbavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share41SendTweet26
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.