रत्नागिरी, ता. 10 : भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. सुजाता साळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांनी जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीवेळी केला. BJP Women Ratnagiri City President Pallavi Patil


जिल्हा समन्वयक अपर्णा पाटील, जिल्हा समन्वयक दीपलक्ष्मी पडते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. शहर सरचिटणीसपदी माजी नगरसेविका संपदा तळेकर व सुप्रिया रसाळ, चिटणीस मेधा खेडेकर, उपाध्यक्षा राजश्री मोरे, प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सत्यवती बोरकर, दीपा आगाशे, मनाली मयेकर, सुगंधा टाकळे, सोशल मीडिया संयोजक शोनाली आंबेरकर यांची नियुक्ती केली. सदस्य म्हणून मीनाक्षी भोळे, रागिणी तळेकर, सानिका पिलणकर, नीलाक्षी शिरगावकर, ज्योत्स्ना भोसले, आस्मा गुहागरकर, रेश्मा तोडणकर, निकीता मोरे, अनिता शिवलकर, वैशाली पाटील, रेश्मा पाटील, शोभा जिरोळे, संगिता कवितके, नीशा आलीम, शिवानी सावंत, हेमाली बनप, वैदेही खडपे, उर्मिला तळेकर, स्मिता मोरे, सुनिता लांजेकर, राधा हेळेकर यांची निवड केली. BJP Women Ratnagiri City President Pallavi Patil


जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी नारीशक्तीचा उल्लेख करत सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गेच्या रूपात आपण कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहावे. महिलांना निवडणुकीत आरक्षण मिळाल्यामुळे २०२९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्यापैकी महिलेला निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्याही न्याय मिळतो, असे सांगितले. BJP Women Ratnagiri City President Pallavi Patil
बाळ माने यांनी मार्गदर्शन करताना जनसंघ ते भाजपचा प्रवास मांडला. रत्नागिरीतील जुन्या काळातली महिला आघाडीची स्थिती सांगितली. आज भाजपची शक्ती वाढत असून महिला आघाडी सक्षम आहे. भाजपची ताकद वाढवण्यासाठी महिला आघाडीने विकसित भारत संकल्पयात्रा यशस्वी करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लोककल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवा, असे आवाहन केले. BJP Women Ratnagiri City President Pallavi Patil
या बैठकीला ओबीसी जिल्हाध्यक्ष सौ. प्राजक्ता रूमडे, जिल्हा सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे व सौ. नुपूर मुळे, जिल्हा सरचिटणीस सौ. अपेक्षा दाभोळकर, प्रदेश सचिव व लोकसभा संयोजिका सौ. शिल्पा मराठे आदींसह कार्यकर्त्या उपस्थित होत्या. BJP Women Ratnagiri City President Pallavi Patil