रत्नागिरी, ता. 30 : भाजपा नेते, माजी आमदार, रत्नागिरी विधानसभा निवडणुक प्रमुख बाळासाहेब माने आणि सौ. माधवी माने यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात महाविजय २०२४ साठी गणपती बाप्पासमोर साकडे घातले. BJP Mahila Morcha vowed to Bappa
यावेळी बाळासाहेब माने म्हणाले की, “महाविजय २०२४ हा लोकसभेप्रमाणेच विधानसभा ते पंचायतराज येथे भाजपाचेच कमळ फुलावे, यासाठी भाजपाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शत प्रतीशत भाजपा हेच ध्येय घेऊन कार्यरत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आणि देशहितासाठी भाजपा हा एकमेव पर्याय आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात भाजपा सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जनसामान्यांचा विकास केला, पण भारताला एक प्रबळ राष्ट्र म्हणून जगजाहीर केलं आहे.” BJP Mahila Morcha vowed to Bappa


गणपतीपुळे येथे उमेद संस्थेतर्फे आयोजित सरस प्रदर्शनालाही भाजपा कार्यकर्त्यांनी भेट दिली. जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांनी स्टॉलधारकांशी संवाद साधला. त्यांच्या स्टॉलवरील वस्तूंचे कौतुक आणि खरेदीही केली व महिलांची उमेद वाढवली. सौ. साळवी म्हणाल्या की “मोदी सरकार हे नेहमी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. सरकारी धोरणे आणि योजना या महिला वर्गांना विविध प्रकारे सक्षम करण्यासाठीच राबविल्या जात आहेत. महिलांनी नक्की या योजनांचा लाभ स्वतः आणि आपल्या कुटुंबासाठी घेऊन सशक्त बनावे.” BJP Mahila Morcha vowed to Bappa


या श्री क्षेत्र गणपतीपुळेचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर आणि चैतन्य घनवटकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे, माजी नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, सौ. संपदा तळेकर, सेल्फी विथ लाभार्थी संयोजिका सौ. सायली बेर्डे, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष तथा वाटद शक्ती केंद्र प्रमुख वर्षा राजे-निंबाळकर उपस्थित होत्या. BJP Mahila Morcha vowed to Bappa