रत्नागिरी, ता. 21 : लबाड लांडगं ढोंग करतंय, देशभक्तीचं सोंग करतंय, पप्पू हो या बंटी संसद में नहीं चलेगी नौटंकी, अशा घोषणा देत कॉग्रेस नेते राहुल गांधी व तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, इंडि यांच्याविरोधात भाजपाने आज निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत कॉंग्रेसचा धिक्कार केला. BJP condemned the Congress alliance
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. काल बुधवारी अधिवेशनावेळी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे वक्तव्य व असभ्य, अशोभनीय वर्तन खासदार बॅनर्जी यांनी केले. तर राहुल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते. त्याचा जोरदार निषेध आज भाजपा कार्यकर्त्यांनी केला. माजी आमदार तथा भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, शहराध्यक्ष राजन फाळके, यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. या वेळी सतेज नलावडे, सचिन वहाळकर, सचिन करमरकर, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, पदाधिकारी विक्रम जैन, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, योगेश मुळ्ये, शैलेश बेर्डे, मंदार मयेकर, नंदू चव्हाण, नितिन जाधव, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोरकर, कामगार मोर्चाचे कोकण संयोजक लीलाधर भडकमरकर, संकेत कदम आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. BJP condemned the Congress alliance


यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले की, भाजपा व मोदीजींनी धनकड यांना राज्यसभेचे सभापती बनवले. ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. काल त्यांनी विरोधी पक्षालासुद्धा म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला होता. परंतु खासदार बॅनर्जीनी सभापतींचा अवमान केला. कोणत्याही परिस्थितीत खासदार बॅनर्जीवर कारवाई करा. या खासदाराला अटक करावी, ही भाजपाची मागणी आहे. BJP condemned the Congress alliance


या वेळी बाळ माने म्हणाले की, सर्वोच्च मंदिर आहे, या संसदेत राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांचा अवमान खासदार बॅनर्जीनी केला. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतोय. आज भाजपाचा देशभर डंका आहे. त्यामुळे कॉंग्रेस व इंडि आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अधिवेशनात लोककल्याणकारी कायदे संमत आहेत. परंतु त्याच्या चर्चेत सहभाग न घेता कॉंग्रेस व इंडिया आघाडी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घालत आहेत. कालचे कृत्य साऱ्या देशाने पाहिले. आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे उपराष्ट्रपती जगदीप धनकड राज्यसभेचे कामकाज चालवताना बॅनर्जीनी अवमान केला व राहुल गांधीनी त्याला बळ दिले. त्यांचा आम्ही निषेध करतो. इंडि आघाडीला इशारा देतो की, २०२४ ला भाजपाचा महाविजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडवायचा आहे. BJP condemned the Congress alliance