भास्कर जाधव, भाजपने हिंदुत्वाशी गद्दारी केली
गुहागर, ता. 24 : आपण सर्वांनी मला आमदार, प्रदेशाध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अशा विविध पदांवर काम करताना पाहीले आहे. गेली ५ वर्ष फक्त आमदार आहे. तरी माझ्यात कधी बदल झाला नाही. मला अहंकार, गर्व नाही. इथल्या जनतेचा आणि माझा, एकमेकांवर असलेला विश्र्वास महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते गुहागरला अर्ज भरण्यापूर्वी आयोजित प्रचार सभेत बोलत होते. BJP betrayed Hindutva
गुहागरमधील प्रचार सभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, भाजपने 25 वर्ष मित्र असलेल्या शिवसेनेत फूट पाडली. राष्ट्रवादी फोडली. मात्र टायगर अभी जिंदा है हे लोकसभेत महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतून इस बार महायुती तडीपार हे दाखवून देण्याची गरज आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात माझ्यासमोर विरोधकच नाहीत. गेले काही महिने शिवसेना गद्दार असल्याची पत्रके डॉ. नातू वाटत आहेत. खोट्याचे खरे करणाऱ्या भाजपवाल्यांनी अनेकवेळा हिंदुत्वाशी आणि 2019 मध्ये शिवसेनशी गद्दारी केली. हिंदुत्व बाजुला ठेवून मुफ्ती महमंद सईद यांच्याशी सत्तेसाठी युती केली. 2019 मध्ये अजितदादांना सोबत घेवून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला प्रथम यांनी केला. देशात मायावती, चंद्राबाबु, यांच्याशी सत्तेसाठी युती केली. माझ्या कुटुंबावर गलिच्छ भाषेत टिका करताना हसणारे विनय नातू आता साड्या वाटत फिरत आहेत. BJP betrayed Hindutva


माझ्यावर टिका करण्यासाठी सध्या त्यांनी निळुभाऊंना नियुक्त केले आहे. विपुल कदम 9 कार्यालयांचे उद्घाटन करुन गेले मात्र आता त्यांना त्यांचे लोकच शोधत आहेत. त्यांना खिंडीत येऊ द्या मग त्यांना हिसका दाखवतो. सध्या राजेश बेंडल यांचे नाव चर्चेत आहे. मात्र हा माणुस सकाळी लवकर उठत नाही आणि रात्री घरी कामे भरपुर असल्याने गायब होतो हे मी स्वत: 2009 च्या निवडणुकीत अनुभवले आहे. राजेश बेंडल यांना स्वत:ला वडिलाच्या नावाने वसतीगृह बांधता आले नाही. फसवून नगरपंचायत घेतली पण समस्या सोडवू शकले नाहीत. तो काय समाजाचा विकास करणार. इथला बहुसंख्य कुणबी समाजाचे नाव घेवून राजकारण करणाऱ्या बेटकरांनाही कुणबी समाजाची मते मिळाली नव्हती. या समाजाचा शिवसेनेवर, माझ्यावर पूर्ण विश्र्वास आहे. लोकसभेत कुणबी समाजाचे नाव घेणारे राजेश बेंडल, हुमणे गुरूजी, अनंत गीते उमेदवार असूनही सुनील तटकरेंचे काम करत होते. तेव्हा यांच्यावर समाज विश्र्वास ठेवणार नाही. त्यामुळे आज समोर विरोधक दिसत नाही. तरीही आपण सावध राहीले पाहीजे. वर्षानुवर्ष धनुष्यबाणासमोरील बटण दाबणाऱ्या जनतेला आपली निवडणूक यावर्षी मशाल आहे हे समजावून सांगा. तुमच्या प्रत्येक अडचणीत सोबत असणारा, तुमच्या समस्या विधानसभेत मांडणारा आमदार म्हणून मला निवडून द्या. असे आवाहन जाधव यांनी केले. BJP betrayed Hindutva


या सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती महेश नाटेकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा महिला संघटक अरुणा आंब्रे, तालुकाप्रमुख सचिन बाईत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शाबीर साल्हे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, आरपीआयचे सुभाष मोहिते आदी पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सुमारे 5 हजार समर्थक उपस्थित होते. BJP betrayed Hindutva